Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघ करिता खर्च निरिक्षक प्रेमप्रकाश मीना यांनी शनिवारी, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी प्रथम तपासणीचे वेळी मतदासंघातील सहा उमेदवारांची खर्च तपासणी केली. तपासणी दरम्यान उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा तपशील नोंदवही, बँक ताळमेळ, खर्चाची मूळ प्रमाणके अपूर्ण सादर केल्याचे निदर्शनास आले आहे.
खर्च निरीक्षक यांनी सर्व 6 उमेदवारांना नोटीसा बजावणेबाबत सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेनुसार उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्या नोटीसांचा खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे उमेदवारांनी 24 तासाच्या आत सादर करणे बंधकारक राहील.
पुढील निवडणूक खर्च तपासणी बुधवार, दिनांक 13 नोव्हेंबर रोजी राहणार असून सदर तपासनीस उमेदवार / प्रतिनिधी यांनी उपस्थित राहणे बाबत आणि पुढील वेळेस योग्य दक्षता घेऊनच खर्च सादर करणेबाबत कळविण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुसाणे गावच्या हद्दीत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, महिलेवर गुन्हा दाखल । Maval Crime
– मावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर – पाहा वेळापत्रक । Maval Vidhan Sabha
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा मोळी पूजन समारंभ सोमवारी पार पडणार । Maval News