व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बसचा अपघात ; बसमधील २६ प्रवासी जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास एका खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला, ज्यात बसमधील २६ प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 9, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Private bus accident on Mumbai Pune expressway 26 passengers in the bus injured

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई व पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास एका खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला, ज्यात बसमधील २६ प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (दि.९) पहाटे पाचच्या सुमारास द्रुतगती मार्गावरील नवीन बोगद्यात कि.मी. ३९.३०० येथे हा अपघात झाला. ट्रक क्रमांक (कए ५६ ५६७५) वरील चालक महेश भीम रेड्डी मुसाने (वय ३१, रा. जि. बिदर, कर्नाटक) याने ट्रकच्या ब्रेकची हवा उतरल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला अर्थात तिसऱ्या लेनवर उभा केला होता. त्यावेळी पाठीमागून येणारी खासगी बस (क्रमांक एमएच ०३ डीव्ही २४१२) वरील चालक बालाजी बळीराम सूर्यवंशी (वय ४१ वर्ष रा. खराबवाडी, जि.लातूर) याला अचानक ट्रक समोर दिसल्याने त्याचे नियंत्रण सुटून ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

यावेळी बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. त्यातील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर व किरकोळ झालेल्या सर्व प्रवाशांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारार्थ रवाना केले आहे. सदर अपघातातील बस व ट्रक ही दोन्ही वाहने आयआरबीच्या पथकाने बाजूला घेऊन तिन्ही लेन वरील वाहतूक सुरळीत केली आहे.

अपघातात बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी बाहेर काढले. महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत कार्य केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुसाणे गावच्या हद्दीत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, महिलेवर गुन्हा दाखल । Maval Crime
– मावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर – पाहा वेळापत्रक । Maval Vidhan Sabha
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा मोळी पूजन समारंभ सोमवारी पार पडणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

शिरगावातील श्री साई मंदिर परिसरात मतदार जनजागृती अभियान, मावळ पंचायत समितीचा उपक्रम । Maval Vidhan Sabha

Next Post

मावळ विधानसभेतील उमेदवारांना खर्च निरिक्षकांच्या नोटीसा ; खर्चाचे अपूर्ण सादरीकरण केल्याने नोटीस । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Expenditure Inspector Notice to Maval Assembly Candidates

मावळ विधानसभेतील उमेदवारांना खर्च निरिक्षकांच्या नोटीसा ; खर्चाचे अपूर्ण सादरीकरण केल्याने नोटीस । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.