व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता गावातच, लगेच वाचा

आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी आयुक्त चव्हाण यांनी केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 3, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
pm-kisan-samman-nidhi-yojana

File Image


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी 6 हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचा लाभ माहे मे किंवा जून मध्ये जमा होणार असून केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत 12 लाख 91 हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. ( facility to link bank account with Aadhaar number for benefits of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi now in village )

यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट बँकत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

हेही वाचा – शिष्यवृत्तीचा लाभ घेत परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा! ‘ती’ अट केली रद्द

पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीवी मध्ये उघडून तो आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थीना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबर मार्फत 15 मे 2023 पर्यंत गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे.

आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी आयुक्त चव्हाण यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर!
– कार्यकर्ते म्हणाले “ताईंना बोलुद्या” पण अजितदादा म्हणाले “सुप्रिया तू बोलू नको” । Sharad Pawar Announce Retirement


Previous Post

पुणे-बंगळुरु महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; ‘हे’ आहेत पर्याय

Next Post

स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे नेते बाळासाहेब गायकवाड यांचे आकस्मिक निधन, मावळ तालुक्यात हळहळ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Balasaheb-Gaikwad-maval

स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे नेते बाळासाहेब गायकवाड यांचे आकस्मिक निधन, मावळ तालुक्यात हळहळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.