व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे-बंगळुरु महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; ‘हे’ आहेत पर्याय

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 3, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Collector-Rajesh-Deshmukh

Photo Courtesy : FB / DIO_Pune


पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ 23 एप्रिल रोजी पहाटे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसच्या अपघाताच्या अनुषंगाने अपघाताची कारणे आणि अपघात टाळण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. ( need urgent measures to prevent accidents on pune bengaluru highway directed by Collector rajesh deshmukh )

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताच्या संभाव्य कारणांबाबत परिवहन विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतचा संपूर्ण रस्ता उताराचा असल्याने इंधन वाचविण्याच्या प्रयत्नात न्यूट्रलमध्ये वाहन चालविण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती असते. यातून वाहनांचा वेग वाढतो. वाहनाला सतत ब्रेक लावल्यामुळे ब्रेकमध्ये अनावश्यक उष्णता व दाब निर्माण होऊन तत्कालीन स्थितीत ब्रेक काम करेनासे होतात. हेदेखील अपघातांचे महत्त्वाचे कारण ठरू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा – कार्यकर्ते म्हणाले “ताईंना बोलुद्या” पण अजितदादा म्हणाले “सुप्रिया तू बोलू नको” । Sharad Pawar Announce Retirement

जड वाहनांची वेगमर्यादा घटविणे आवश्यक – कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा घटवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. त्याअनुषंगाने ट्रक मालक संघटनांसोबत बैठक घेण्यात यावी, असे निर्देष जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले. एनएचएआय, पोलीस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह सेव्ह लाईफ फाऊंडेशन संस्थेने सुचविलेल्या विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका – या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांतर्गत तसेच कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस चौकी स्थापन करणे, त्या ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पीएएस) कार्यान्वित करणे, स्वामी नारायण मंदिर ते दरी पूल दरम्यान वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलरची संख्या वाढवणे, तातडीचे मदत देण्यासाठी पोलीस चौकीजवळ क्रेन तैनात ठेवणे, दरी पुलाजवळ सेवा रस्त्याला जड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी हाईट बॅरिकेट्स बसवणे आदी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

नियम तोडणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी 2 इंटरसेप्टर वाहने – राष्ट्रीय महामार्गाच्या या लांबीत वाहतूक नियमांचे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना तातडीने रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेला एक आणि ग्रामीण पोलीसांना एक अशी दोन इंटरसेप्टर वाहने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याबाबत तातडीने प्रस्ताव द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

अधिक वाचा –
– शिष्यवृत्तीचा लाभ घेत परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा! ‘ती’ अट केली रद्द
– कामशेत इथे इंद्रायणी नदीत बुडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, आपदा मित्रांकडून मृतदेह पाण्याबाहेर


dainik maval jahirat

Previous Post

शिष्यवृत्तीचा लाभ घेत परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा! ‘ती’ अट केली रद्द

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता गावातच, लगेच वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pm-kisan-samman-nidhi-yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता गावातच, लगेच वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.