नौदलात कमांडंट पदावर नोकरीला असल्याची बतावणी करून लोणावळा परिसरातील मुलांना आय.एन.एस. शिवाजी लोणावळा येथे नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन त्यांचेकडुन प्रत्येकी ३ लाख रूपयांची मागणी करून ती रक्कम स्विकारण्यास आलेल्या तोतया नौदल अधिकाऱ्यास सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मा.सत्यसाई कार्तिक, सपोनि /सचिन राऊळ, लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, सपोनि / सुनिल पवार, सहा. फौज /बनसोडे, पोहवा/ पाटणकर, पोकॉ / कुलकर्णी, पोकॉ/ गायकवाड, पोका / मोरे तसेच आय.एन.एस. शिवाजी लोणावळा नेव्हल पोलीस टिम यांचे मदतीने संयुक्तपणे छापा टाकुण कारवाई करून ताब्यात घेण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्याच बरोबर त्याचे दोन साथीदारांनाही त्यांचेकडील हुंदाई व्हेरना या मोटार कारसह ताब्यात घेण्यात आले असता त्यांचेकडुन एक नौदलाच्या पांढऱ्या रंगाचा ड्रेस तसेच नौदलाचे नेमप्लेट, शिक्के, तसेच इतर साहित्य असा एकुण १५ लाख रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ( fake naval officer busted lonavla city and INS Shivaji Naval Police action )
सदर गुन्हयातील फिर्यादी नामे ऐश्वर्या कृष्णा लेंडघर, रा. भांगरवाडी लोणावळा यांचा नोटरीचा व्यवसाय असुन त्यांचेकडे माहे सप्टें २०२२ मध्ये नौदलाच्या गणवेशात आलेल्या तोतया नौदल अधिकारी नामे आकाश काशिनाथ डांगे, वय २८ वर्षे, रा. मु.पो. भाडाळी बु।। ता. फलटण, जि. सातारा याने फिर्यादी यांचेकडुन प्रतिज्ञापत्र बनवुन घेतले. त्यानंतर ते वारंवार फिर्यादी यांचे कार्यालयात येवुन त्यांची ओळख वाढवुन त्यांना लोणावळा परीसरातील तसेच त्यांचे नातेवाईकांना नौदलात नोकरी लावण्याची गळ घालुण एकुण १९ जणांना नौदलात विविध पदावर नोकरीस लावण्याचे बदल्यात प्रत्येकी ३ लाख रूपये घेण्याचे ठरवुन बोलणी केली होती.
त्यावर फिर्यादी यांनी त्यांचे ओळखीच्या आय. एन. एस. शिवाजी लोणावळा येथील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची भरती केली जात नसल्याचे समजल्याने फिर्यादी यांनी आरोपीशी संपर्क साधुन आणखी एका मुलाला नोकरीस लावण्या संदर्भात विचारणा केली असता तो त्यासाठी लगेचच तयार झाल्याने फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी लागलीच पोलीसांशी संपर्क साधुन आरोपी पैसे स्विकारून नोकरीचे नियुक्तीपत्र देण्या करीता येणार असल्याचे कळविल्याने लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच आय.एन.एस.शिवाजी लोणावळा नेव्हल पोलीस टिम यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचला.
सदर ठिकाणी छापा टाकुन तीन संशयित आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी करून त्यांचे ताब्यातील हुंदाई कार नं. एम. एच. ४२ ए. आर. २००५ ही ताब्यात घेवुन तिची झडती घेतली असता त्यामध्ये नौदलाचा पांढऱ्या रंगाचा ड्रेस, पांढरा शुज, बेल्ट, नेमप्लेट तसेच इतर साहित्य व राजमुद्रा असलेली गाडीची नंबर प्लेट असा एकुण १५ लाख रूपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक डुबल, सपोनि पवार, सपोनि सचिन राऊळ, सहा. फौज / बनसोडे, पोहवा / पाटणकर, पोकॉ/ कुलकर्णी, पोकॉ/ गायकवाड, पोकॉ/ मोरे यांनी आय. एन. एस. शिवाजी लोणावळा नेव्हल पोलीस टिम यांचे मदतीने केली आहे.
अधिक वाचा –
– ज्ञानज्योती फाऊंडेशनमार्फत पवळेवाडी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य
– गोमांस वाहतूकप्रकरणी दोनजण ताब्यात; पहाटेच्या सुमारास पोलीस आणि गोरक्षकांची संयुक्त कारवाई । वडगाव मावळ