Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप भाताचे अधिक उत्पन्न घेण्यासाठी प्रमाणित इंद्रायणी जातीच्या बी बियाणे व सेंद्रीय खतांचा वापर करावा असे प्रतिपादन मावळ ऍग्रोचे संस्थापक अध्यक्ष माऊली दाभाडे यांनी केले.
पवन मावळातील ओवळे गावातील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात सहकार महर्षी माऊली दाभाडे बोलत होते. यावेळी पोल्ट्री उद्योजक बाबुराव येवले, तानाजी पडवळ, दत्तात्रय साठे, मुरलीधर साठे, सोपान इंगळे, गेनभाऊ इंगळे, कालिदास कराळे, विश्वास लोखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून दाभाडे म्हणाले की, मावळ तालुका हा खरीप भात पिकाचा अग्रेसर असलेला तालुका असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अधिक उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्न करावेत. शेती विकास सोसायटीचे चेअरमन नवनाथ साठे व माजी सरपंच संदीप साठे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News


