Dainik Maval News : शेती व्यवसायात शेतकऱ्यांनी सुधारित जातीचे बी-बियाणे व सेंद्रीय खतांचा वापर करून अधिक उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मावळ ॲग्रोचे संस्थापक अध्यक्ष माऊली दाभाडे यांनी केले. आंदर मावळ मधील आदिवासी विभागातील वाहनगाव येथे आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या विशेष सभेत ते बोलत होते.
यावेळी मारुती वाडेकर, प्रकाश देशमुख, मधुकर तुपके, आशाताई खांडभोर, मुकुंद पवार, नामदेव जाधव, अनिल आलम, सचिव मदन आडीवळे यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- मावळ तालुक्यात सुहासिक इंद्रायणी भात (तांदूळ) मोठ्या प्रमाणावर पिकत असून या पिकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे व सेंद्रीय खतांचा प्रभावी वापर करावा असे सांगून दाभाडे म्हणाले की यामुळे अधिक उत्पादन तर मिळतेच मात्र आपल्या शेतकऱ्याला चांगला भावही मिळतो.
आगामी काळात मावळ ॲग्रो शेतकऱ्यांना इंद्रायणीचे प्रमाणित बियाणे, त्याचबरोबर सेंद्रिय खते पूरवून त्यांच्या मालाची खरेदी चांगल्या भावाने करणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका