मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिट पॉइंट जवळ आज (शनिवार, 12 नोव्हेंबर) रोजी हा अपघात झाला. कार डिव्हाईडरला धडकल्याने हा अपघात झाला. अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. ( Fatal Accident Near Khopoli Exit On Mumbai Pune Expressway One Died )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर 39 खोपोली एक्झिट येथे सदर अपघात झाला. यात कार अक्षरशः डिव्हाईडरमध्ये घुसली. हा अपघात इतका भयंकर होता की, एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. या दोघांनाही पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल इथे नेण्यात आले. सुप्रिया किसन माने (वय 30, रा. कल्याण) ही महिला या अपघातात मृत पावली असून शेखर शिंदे (वय 31, रा. भिवंडी) हे जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे.
अधिक वाचा –
– हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा तळेगाव दाभाडेत भाजपाकडून निषेध
– व्हिडिओ : जेव्हा शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार..’, अजित पवारांनी सांगितला तो किस्सा