यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि. 5 मार्च) रोजी भीषण अपघात झाला. द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान किलोमीटर 38.100 येथे हा अपघात झाला. एका भरधाव ट्रेलरने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या धडकेत एकूण 2 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 5.30 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई लेनवर कि.मी. 38:100 या ठिकाणी ट्रक (क्रमांक MH -43-Y -9455) चालक बाळू नामदेव मेटे (वय 57, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) हे कराड येथून नवीमुंबई कडे जात असताना त्यांचा मुलगा तथा क्लिनर राहुल बाळू मेटे (वय 26) हा ट्रकच्या उजव्या बाजूकडील टायरमधील हवा चेक करण्याकरिता उतरला होता. त्याचवेळी पाठीमागून येणारा ट्रेलर (क्रमांक MH-46-BM-3701) याची त्याला जोरात धडक बसली. त्यामुळे तो ट्रेलर खाली येऊन जागीच मयत झाला. ( Fatal accident on Mumbai Pune Expressway 2 people were killed in collision between truck and trailer )
त्याचवेळी ट्रेलर चालक विनोद गौड याने जोरात ब्रेक लावल्याने ट्रेलरवरील अंदाजे वीस टन वजनाच्या दोन लोखंडी कॉईल चैन लॉक तुटून निसटून ट्रेलरच्या केबिन वरून एक्सप्रेस वेच्या पहिल्या आणि तिसऱ्या लेनवर पडल्या. सुदैवाने कॉईलचा धक्का इतर कोणत्याही वाहनाला लागला नाही. मात्र दुर्दैवाने ट्रेलर चालक विनोद गौड हा केबिनमध्ये दबला आणि त्यात अडकून पडल्याने जागीच मयत झाला.
ह्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाट आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी, मृत्युंजय देवदूत, लोकमान्य हॉस्पिटल निगडीच्या रुग्णवाहिका आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य करून मृतदेह बाहेर काढले. तसेच बाधित वाहने आणि कॉईल हटवून काही वेळ ठप्प झालेली वाहतूक मोकळी केली. दोनही मृतदेह खोपोली नगर पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले. खोपोली पोलीस स्टेशनचे हद्दीत ही घटना घडल्याने अपघाताची रीतसर नोंद तिथे करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन । PM Narendra Modi
– पवनमावळ विभागातील घारखेल माथा ते आढले-पुसाणे रस्त्यासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध; रस्त्याचे भूमिपूजनही संपन्न
– सोमाटणे-परंदवडी रस्ता ते सोमाटणे गावठाण रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाखांचा निधी; आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन