Dainik Maval News : पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून दोन जणांनी पिता-पुत्राला कोयत्याने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. ६ मे) रात्री अकरा वाजताच्या सुमारास साईनगर, मामुर्डी येथे घडली.
हरिश गणेश नायड (वय ४०, रा. साईनगर, मामुर्डी) यांनी याबाबत बुधवारी (दि. ७) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरण शरद हिवाळे (वय २८, रा. आकुर्डी) व सुमित शरद हिवाळे (वय ३०, रा. मामुर्डी) या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात ५ मे रोजी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांना मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास साईनगर, मामुर्डी येथे शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या मामुर्डी येथील घराजवळ फिर्यादी व त्यांच्या वडिलांच्या अंगावर रिक्षा चढविण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्याच फिर्यादी हे खाली पडले असता आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण व कोयत्याने वार करून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीच्या इको गाडीचे नुकसान करण्यात आले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne