मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावात एक जन्मदात्या बापाने मुलाचा कुऱ्हाडीने घाव घालत खून ( Murder Of Son By Father ) केल्याची थरारक घटना घडली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत ( Talegaon MIDC Police ) नोंद करण्यात आली असून आरोपी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
समीर बाळू बोरकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर पोलिसांनी आरोपी बाप बाळू बबन याला अटक केली आहे. ( Father Killed Son Sudumbre Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदुंबरे येथे बाळू बोरकर आणि त्यांचा मुलगा समीर बोरकर हे वास्तव्यास होते. मुलगा समीर हा दररोज दारू पिऊन घरी येत असे. यातून बाप-लेकात सतत भांडण-वाद होत होते. कधीतरी या गोष्टीचा शेवट झाला पाहिजे, असे बाप बाळू बोरकर सतत बोलत असे. यातूनच रागाच्या भरात त्याने मुलावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याला ठार मारले. ( Father Killed Son ) तळेगाव एमआयडीसी पोलिस सदर प्रकरणाच अधिक तपास करत आहे.
अधिक वाचा –
– भयंकर! कचरा टाकायला गेलेल्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल
– पवनानगर चौकाजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपघाताला आयतं निमंत्रण