मित्राबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एकाने वीस वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने वार करुन तिला जखमी केल्याची घटना कामशेत शहरात ( Kamshet Maval ) घडली आहे. सोमवार (दिनांक 31 ऑक्टोबर) रोजी सकाळच्या सुमारास कामशेतमधील इंद्रायणी कॉलनी परिसरात ही घटना घडली. ( Fatal Attack on Girl at Kamshet City Maval Taluka Crime )
या प्रकरणी फिर्यादी तरुणीने कामशेत पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानुसार सुनील रामदास ढोरे (वय 22, रा. मोरया कॉलनी, वडगाव मावळ) आणि एक अनोळखी आरोपी (वय अंदाजे 20 ते 25) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी चव्हाण हे करत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही कचऱ्याची पिशवी कचराकुंडीत टाकत असताना एका अनोळखी आरोपीने तिच्या मानेवर अचानक वार केला. त्यावेळी तरुणीने मागे वळून पाहिले असता आरोपीने, माझा मित्र सुनील ढोरे याच्याशी लग्न करण्यास का नकार दिला? असे म्हणून हातातील धारदार शस्त्राने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादीने प्रतिकार केला. त्यानंतर, आरोपीने तिला जोरात ओढल्याने तिच्या हातांना दुखापत झाली.
अधिक वाचा –
– मावळचं राजकारण I मामाच्या केसालाही धक्का लागणार नाही, भाच्याने ठणकावून सांगितले
– Video : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, आडगाव येथे 2 मुलांचा बुडून मृत्यू