व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : महिला वर्ग आणि शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या अनेक मोठ्या घोषणा, लगेच वाचा…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज (बुधवार, दि 1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 1, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Union-Budget-2023

File Image


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज (बुधवार, दि 1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांची सुरुवातीला महत्वाची माहिती….

अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच, भारताच्या “अमृतकाळातलं” पहिलं अर्थसंकल्पीय भाषण असल्याचे सांगताना भारताच्या 100व्या वर्षाच्या वाटचालीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असेल असे निर्मला सितारमन म्हणाल्या. तसेच, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देताना, PM आवास योजना, किसान सम्मान निधी, कोरोना लसीकरण आदींची माहिती सभागृहाला दिली. ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण, हस्तकलेच्या कलाकारांना बळ, पर्यटनाला प्रोत्साहन आणि ग्रीन ग्रोथ या चार गोष्टी अमृत काळात पुढे जाताना महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पात महिला वर्ग आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा…

  • 81 लाख बचत गट भारतात सक्रीय असून त्यांना भरीव मदत करणार. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या विकाससाठी सरकार कटिबद्ध आहे.
  • लाभार्थ्यांच्या खात्यात थेट मदत देण्यावर सरकारचा भर असून यापुढेही गरीब जनतेला सरकार 1 वर्ष मोफत धान्य देणार आहे.
  • डाळींसाठी विशेष हब तयार केले जाणार असून सरकार कापसातून शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
  • शेतकऱ्यांसाठी सरकार सर्वाधिका काम करत असून शेतकरी, राज्य सरकार आणि उद्योगांचा समन्वय यातून विकास, प्रगती करण्यावर भर देत आहे.
  • ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.
  • कृषीपूरक स्टार्टअपसाठी मदत करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे.
  • छोट्या छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली.
  • देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

केंद्रातील मोदी सरकारचा हा निवडणूकपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने सर्वांचेच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते. आज (बुधवार) सकाळी राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला औपचारिक मंजूरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाही सितारमन यांनी डिजीटल पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला.

अधिक वाचा –

– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारची आदिवासी समुदायांसाठी मोठी घोषणा, देशात पीएम पीव्हीटीजी योजना राबवणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारचे ‘मिशन सप्तर्षी’, ‘या’ सात घटकांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प, जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहरात ‘हिंदूहृदयसम्राट चषक-2023’ क्रिकेट स्पर्धेचा थरार

Next Post

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : भारतीय रेल्वेसाठी तब्बल 2.4 लाख कोटींचा निधी ते देशात 50 नवीन विमानतळे उभारणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Union-Budget-2023-live

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : भारतीय रेल्वेसाठी तब्बल 2.4 लाख कोटींचा निधी ते देशात 50 नवीन विमानतळे उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.