Dainik Maval News : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील वित्तीय सेवा विभाग व भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर वित्तीय समावेशन योजनांचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाला पुढे नेत युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे (दि.६) आंदर मावळ कोंडिवडे येथे वित्तीय समावेशन संतृप्ती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला युनियन बँक ऑफ इंडियाचे अंचल प्रमुख पुणे विपिनकुमार शुक्ला, क्षेत्र प्रमुख ग्रेटर पुणे यू. के. पाल , शाखा प्रबंधक मावळ वडगाव मावळ जैमिन खुराना, शाखा प्रबंधक तळेगाव आशिष कुमार, ग्रामीण विकास अधिकारी मावळ श्रीकांत वाघ , अनिल वाडेकर उपस्थित होते. तसेच कोंडिवडे गावचे सरपंच राधा विश्वनाथ मुंढारकर यांनीही हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमात युनियन बँक ऑफ इंडियाच्या मावळ वडगाव व तळेगाव शाखेचे सुमारे १०० हून अधिक ग्राहक, पंचायत प्रतिनिधी, बिझनेस करस्पॉन्डंट्स तसेच इतर मान्यवर नागरिक सहभागी झाले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारत सरकारद्वारे विविध बँकांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या री-केवायसी, प्रधानमंत्री जन-धन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे व त्याबाबत जनजागृती करणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान अंचल प्रमुख पुणे विपिनकुमार शुक्ला व क्षेत्र प्रमुख ग्रेटर पुणे यू. के. पाल यांनी आपल्या मनोगतामध्ये ग्रामीण व अर्ध-शहरी जनतेसाठी बँकेकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना जसे की पॉली हाऊस कर्ज, शिक्षण कर्ज, गृहनिर्माण कर्ज, नारीशक्ती योजना (महिलांसाठी कर्ज) याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच, बँकिंग सेवांपासून वंचित प्रौढ व्यक्तींना प्रधानमंत्री जन-धन खात्याच्या माध्यमातून बँकिंग सेवांशी जोडणे, विद्यमान खात्यांची री-केवायसी करणे, प्रत्येक खात्यात नामनिर्देशन नोंदवणे, मृत्यू दाव्यांच्या बाबतीत योग्य दावे करणे, तसेच सायबर फसवणुकीपासून सावध राहणे याबाबतही जनजागृती करण्यात आली.
प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक खाते सुरू करून सामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा दिली जाते. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत केवळ ४३६ रुपये वार्षिक हप्त्यावर वय १८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांना दोन लाखांचे सामान्य व अपघात विमा संरक्षण दिले जाते. प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा विमा योजनेत केवळ २० रु. वार्षिक हप्त्यावर वय १८ ते ७० वर्षांपर्यंतच्या नागरिकांना दोन लाखांचे रुपये अपघात विमा संरक्षण दिले जाते. तसेच अटल पेन्शन योजनेत वय १८ ते ४० वर्षांपर्यंतचे नागरिक सहभागी होऊ शकतात.
कार्यक्रमा दरम्यान पॉली हाऊस च्या लाभार्थ्यांना लोन संकशन लेटर मान्यवरा तर्फे देण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट उपस्थित असलेले प्रतिधीनि बुधाजी जागेश्वर, दिगंबर आगिवले, माजी उपसरपंच रोहिदास असवले, सुभाष पिंगळे पराग सावंत रोहिदास जांभूळकर यांनी युनियन बँक व मान्यवरांचे आभार व्यक्त करून सत्कार केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित