व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारचा उपक्रम

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 11, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राज्यस्तरीय समितीची बैठक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय बनसोडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार दिलीप बनकर, आमदार सुमित वानखेडे, आमदार हेमंत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विठ्ठल लंगे, आमदार उमेश यावलकर, आमदार समीर कुणावर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. आमदार अभिमन्यू पवार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभाक्षेत्र निहाय समिती स्थापन केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष संबंधित विधानसभा क्षेत्राचे आमदार राहतील, विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सदस्य सचिव प्रांतअधिकारी राहणार असून त्यांच्या समवेत समितीमध्ये महसूल, पोलीस , ग्रामविकास अधिक विभागाचे अधिकारी असतील. तांत्रिक व कार्यकारी यंत्रणेच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने अभ्यास गटाने याबाबत आराखडा तयार करावा, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

शेत व पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी उपाययोजना करणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागात रस्त्यांची कामे दर्जेदार होत आहेत. बळीराजा शेत पाणंद रस्ते मोहिमेस गती देण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित केला असून गाव पातळीवर याची अंमलबजावणी सुरू होत आहे. या अनुषंगाने शेत व पाणंद रस्त्याची कामे गुणवत्ता पूर्ण काम होण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. शेत पाणंद रस्ते बनविताना प्रामुख्याने माती, मुरूम व खडी याचा वापर होत असल्याने त्या माध्यमातून तयार होणारे थर आणि त्यांची मजबुती याकडे लक्ष दिले जावे असे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.

रोजगार हमी योजना मंत्री गोगावले म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या समन्वयाने महाराष्ट्रात राबविली जात आहे. यातून असंख्य कामे सुरु आहेत. बळीराजा शेत व पाणंद रस्ते मोहिमेत देखील चांगली कामे करण्यात येतील.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, शेत व पाणंद रस्ते योजनेमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या तंट्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव खारगे यांनी योजनेसाठी अभ्यास गटाने तयार केलेल्या उपाययोजनाची माहिती दिली. बैठकीमध्ये उपस्थित सदस्य आमदार यांनी चर्चेत सहभाग घेऊन बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणी व कार्यवाहीसाठी विविध मुद्दे व सूचना मांडल्या.

शेत व पाणंद रस्ते नोंद करण्यास प्राधान्य देताना, रस्ते नोंद नकाशे ग्राम पंचायत स्तरावर प्रदर्शित करणे यासह मंजूर केलेले रस्ते खुले करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित


Previous Post

गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative

Next Post

आंदर मावळातील कोंडीवडे येथे वित्तीय समावेशन संतृप्ती अभियानाचे आयोजन ; युनियन बँक ऑफ इंडियाचा उपक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Financial Inclusion Saturation Campaign organized at Kondivade in Andar Maval Initiative of Union Bank of India

आंदर मावळातील कोंडीवडे येथे वित्तीय समावेशन संतृप्ती अभियानाचे आयोजन ; युनियन बँक ऑफ इंडियाचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.