खोपोली नगरपालिका संचालित र. वा. दिघे वाचनालयात आग लागल्याची माहिती रात्री एक वाजताच्या (मंगळवार, 29 नोव्हेंबर) सुमारास स्थानिकांनी दिली. खोपोली नगरपालिकेचे अग्नीशमन दल, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तात्काळ पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, स्थानिकांनी देखील यावेळी मोलाची मदत केली. ( Fire Broke Out At R V Dighe Library In Khopoli Raigad )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
र. वा. दिघे वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर आग मोठ्या प्रमाणात लागल्याने धुराने आतील वातावरण भरून गेले होते. ग्रंथ विभागाचे दरवाजे उघडून काचेच्या खिडक्या फोडल्यानंतर आगीमुळे तयार झालेले वातावरण निवळले आणि आग विझवण्यासाठी आलेल्या यंत्रणेला काम करण्यास संधी मिळाली. ग्रंथ विभागाच्या एका कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात रद्दी आणि पुस्तकांचा साठा होता आणि तेथील फर्निचर हे लाकडी होते, त्यामुळे तेथे आगीचे प्रमाण प्रचंड मोठे होते.
साधारणपणे एक तासाहून अधिक वेळानंतर पाणी आणि अग्नीशमन उपकरणांचा वापर केल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. वाचनालयात असलेली संगणक प्रणाली आणि विद्युत उपकरणे शॉर्ट सर्किटमुळे निकामी झाली आहेत. सुदैवाने यंत्रणांनी घेतलेल्या खबरदारी मुळे आगीचे प्रमाण नियंत्रित राहिले अन्यथा संपूर्ण ग्रंथसंपदा आगीमध्ये जळून खाक झाली असती. वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करण्याकरिता आरक्षित असलेले क्षेत्र मात्र या प्रलयात सुरक्षित राहिले आहे. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दूरे आणि खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.
अधिक वाचा –
– Video : कार्मेल कॉन्व्हेंट खोपोली येथे लायन्स क्लबच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन
– मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी परिवहन खाते विशेष प्रयत्न करणार
– सामाजिक भान जपणारा कृतिशील लेखक हरपला, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे 74व्या वर्षी दुःखद निधन । Nagnath Kotapalle Died