पुणे (दिनांक 27 जून) : जुलै 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 3 आणि 4 जुलै रोजी खेड, 10 आणि 11 जुलै रोजी मंचर, 17 आणि 18 जुलै रोजी जुन्नर, 24 आणि 25 जुलै रोजी वडगाव मावळ आणि 27 जुलै रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 30 जून रोजी सायंकाळ 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे. ( firm license by pimpri chinchwad sub rto office gather in maval taluka )
अधिक वाचा –
– Breaking! वडगाव फाट्यावर प्लास्टिकपासून ऑइल बनवणाऱ्या कंपनीत वायू गळती, वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली
– कामशेत पोलिसांकडून पंडित नेहरू विद्यालयात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यशाळा