पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली काही तरुण मंडळी भक्तिमय विचारधारणेतून संघटित होऊन आपल्या “श्री देवदर्शन यात्रा समिती पुणे” ही संस्था चालवत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
समितीच्या वतीने गेली कित्येक वर्षे नियमित आषाढी पालखी वारी सोहळ्याकरीता भक्तिमय वसा जपत विविध समजोपायोगी उपक्रम राबविले जातात. याही वर्षी सदस्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध भागांतून पुण्यात आलेल्या कित्येक वारकरी दिंड्यांना समितीच्या वतीने अनुभवी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन “श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” चे वाटप करण्यात आले. ( first aid kits to warkari by shree devdarshan yatra samiti pune )
दिंड्यांच्या प्रमुख चालकांच्या हाती हे संच सुपूर्द केले गेले. वारी दरम्यान प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बारीक सारीक गोष्टी अन् उपयुक्त औषधे या संचामधून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
हेही वाचा – ‘श्री देवदर्शन यात्रा समिती पुणे’ यांच्याकडून ‘स्वच्छ सुंदर निर्मळ वारी’चे आवाहन । Wari 2023
समितीच्या वतीने दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित नावलौकिक वाढविणाऱ्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे दिंडीतील सर्व वैष्णव भक्तगणांनी भरभरून कौतुक करून सर्वश्रींना भविष्यातील वाटचाली साठी आशीर्वाद दिले. यास प्रतिसाद म्हणून येणाऱ्या काळात असेच संघटित राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील राहण्याचा मानस असल्याचे समितीच्या प्रमुख सदस्यांनी नमूद केले.
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंसमवेत मावळ बाजार समितीच्या संचालकांनी घेतली पणन संचालकांची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा
– माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पुणे विभाग आणि जिल्हा सर्वोत्तम, लोणावळा नगरपरिषदेला दोन पुरस्कार