व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खोपोली शहरात प्रथमच पाळीव मांजरांची नोंदणी आणि आरोग्य तपासणी शिबिर, शरीरात बसवली मायक्रोचीप

पाळीव मांजरांच्या नोंदणी शिबिराच्या सकाळच्या सत्रात नोंदणीसह तपासण्या, औषधोपचार, सल्ला आणि प्रमाणपत्राचे वितरण केले गेले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 30, 2023
in महाराष्ट्र
pet-cat-registration-camp

Photo Courtesy : Gurunath Sathelkar


भारतातील सर्वात मोठी पाळीव मांजराची संघटना “फेलाईन क्लब ऑफ इंडिया”, लायन्स क्लब ऑफ खोपोली आणि श्री कृपा ॲक्वेरियम यांच्या माध्यमातून डॉ. रामहरी धोटे सभागृह – लायन्स सर्व्हिस सेंटर येथे खोपोली शहरातील पाळीव मांजरांची नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मांजरांच्या शरीरात 16 अंकी मायक्रोचीप बसवली गेली त्याच सोबत मांजरीची जात आणि मालकीचे प्रमाणपत्रही दिले गेले. मांजरांना अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन देऊन तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली गेली आणि मांजरांसाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि औषधे देखील भेट दाखल दिली गेली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

फेलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकिब पठाण, झेड कॅनिंन डॉग ट्रेनिंग अकॅडमी – नाशिकचे अध्यक्ष विक्रांत देशमुख, लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा शिल्पा मोदी, श्री कृपा ॲक्वेरियम – खोपोलीचे संचालक प्रवीण शेंद्रे, प्रयोग केनलचे संचलक प्रवीण व्यास, Drools पेट फूडच्या उर्मिला पाटील आणि जितेंद्र शहा, श्री कृपा ॲक्वेरियम – माणगावच्या संचालिका संध्या कुलकर्णी, ग्रेन झिरो पेट फुडचे संदेश जाधव, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर आणि नवीन मोरे अश्या लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिबिरात सहभाग घेतला. ( first time pet cat registration and health check camp in Khopoli city raigad )

पाळीव मांजरांच्या नोंदणी शिबिराच्या सकाळच्या सत्रात नोंदणीसह तपासण्या, औषधोपचार, सल्ला आणि प्रमाणपत्राचे वितरण केले गेले तर संध्याकाळच्या सत्रात झेड कॅनन डॉग ट्रेनिंग अकॅडमी नाशिकचे विक्रांत देशमुख आणि फेलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकीब पठाण यांनी मांजराच्या मालकांना मार्गदर्शन आणि महत्वाच्या टिप्स दिल्या.

या शिबिरात शंभरहून अधिक पाळीव मांजरांच्या मालकांनी आणि अनेक प्राणी मित्रांनी या शिबिराचा लाभ घेतला. खोपोली सारख्या या शहरात इतर शहरांच्या तुलनेत मिळालेला उत्स्फूर्त सहभाग समाधानकारक होता असे साकिब पठाण यांनी आपले मत व्यक्त केले. धकाधकीच्या जीवनात प्राणिमात्रांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने अशा स्वरूपाच्या शिबिरांचे आयोजन वेळोवेळी केले जाईल असेही त्यांनी अभिवचन दिले. 11 जून रोजी वाशी सीबीडी एक्जीबिशन हॉल येथे जगातल्या सर्वात मोठी पाळीव मांजरांची चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे त्यासाठी खोपोलीतल्या मायक्रोचिपींग केलेल्या सर्व मांजरांच्या मालकांना स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

अधिक वाचा –
– खोपोलीतील सुमित डे रायगड जिल्ह्यात वाणिज्य विभागात पहिला, कौतुकाचा होतोय वर्षाव
– काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, काही दिवसांपूर्वीच वडिलांचेही झाले होते निधन


dainik maval jahirat

Previous Post

खोपोलीतील सुमित डे रायगड जिल्ह्यात वाणिज्य विभागात पहिला, कौतुकाचा होतोय वर्षाव

Next Post

भोयरे गावातील अंतर्गत रस्ते विकास कामाला सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bhoyre-village-maval

भोयरे गावातील अंतर्गत रस्ते विकास कामाला सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.