Dainik Maval News : विजयादशमी निमित्त (दसरा) ‘आधी तोरण राजांच्या गडाला, मगच माझ्या दाराला’ हे ब्रीद पाळून श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था आणि सह्याद्री व मी परिवार जोडलेल्या मावळ्यांनी मुळशी-मावळच्या सीमेवर असलेल्या तिकोना गडाचे मुख्य प्रवेशद्वार तसेच मंदिराला तोरण बांधले.
श्री शिवदुर्ग संवर्धन व सह्याद्री आणि मी परिवार मावळ या संस्थांच्या माध्यमातून मागील १३ वर्षांपासून दरवर्षी विजयादशमीचे औचित्य साधत तिकोनासह विविध गडांवर पाना-फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच तेथील मंदिर व परिसराची स्वच्छता करून पूजन केले जाते.
विशेष म्हणजे या मोहिमेत सहभागी होणारे मावळे हे आपल्या घराची, दुकानाची, वाहनांची पूजा बाजूला ठेवून अगोदर गडाच्या पूजेसाठी हजर असतात. यामध्ये तरुण मुला-मुलीबरोबरच, लहान मुले, महिलादेखील गड चढून उत्साहाने सहभागी होतात.
या पूजन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आदल्या रात्रीच गडाच्या पायथ्याशी मुक्कामी जातात व विजयादशमी दिवशी भल्या सकाळी गडावर जाऊन मोठ्या श्रद्धेने मुख्य प्रवेश-द्वारावर पाना-फुलांचे तोरण बांधतात. या वेळी तिकोना पेठ येथील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तोरण महोत्सवाचे नियोजन , विजय खैरे, तुषार कालेकर,सागर शिंदे, रुपेश शेलार, मनोज भिसडे,सुजीत मोहोळ, शंकर शेलार, आकाश महाराज सुतार, दत्ता वाडेकर, समीर पोटफोडे, मयुर गाडे, भूषण ठुले,आदींनी. शिववंदनेने गडावरील तोरण महोत्सव व मंदिर पूजेची सांगता कारण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल