व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ! आमदार सुनिल आण्णांसह 5 जणांची दांडी, चर्चांना उधाण, अजितदादा म्हणाले…

लोकसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीला मोठे अपयश आले आहे. त्यातही राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक अपयश आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 6, 2024
in महाराष्ट्र
ajit pawar calling phone image

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीला मोठे अपयश आले आहे. त्यातही राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक अपयश आले. या अपयशावर विचारमंथन करण्यासाठी आज (दि. 6 जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांची आणि नंतर सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मुंबईतील या बैठकीला राष्ट्रवादी पक्षातील 5 आमदारांनी दांडी मारली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अगोदर वरीष्ठ नेत्यांची सभा झाल्यानंतर लगेचच राज्यातील सर्व विधानसभा आणि विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक अजितदादांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वठिकाणच्या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. परंतू या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार सुनिल आण्णा टिंगरे, आमदार आण्णा बनसोडे, आमदार नरहरी झिरवळ, आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि आमदार राजेंद्र शिंगणे हे गैरहजर राहिले होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे दिवसभर अनेक चर्चांना उधाण आले होते. अगदी त्यांच्या घरवापसीची चर्चा होते होती. परंतू अखेर स्वतः अजित दादांनी यावर पडदा टाकला आहे. ( five mla of ncp party ajit pawar group were absent from meeting after lok sabha elections result )

अजितदादांची पत्रकार परिषद –
आमदारांसोबत बैठक संपन्न झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूकीत आलेल्या अपयशाची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. सोबतच दोन्ही बैठकांबाबत माहिती दिली. तसेच गैरहजर राहिलेल्या आमदारांबद्दलही सांगितले. पाचही आमदारांनी आपल्या अनुपस्थितीचं कारण सांगितले आहे, तसेच संपर्क केला असल्याचे अजितदादांनी स्वतः सांगितले. तसेच होणाऱ्या सर्व चर्चा चुकीच्या असून सर्वजण सोबत आहेत. पाचही जण वैयक्तिक कारणामुळे आज गैरहजर होते, हेही दादांनी स्पष्ट केले.

का होते आमदार गैरहजर?
आमदार धर्मराव बाबा आत्राम हे आजार असल्याने ते मुंबईत बैठकीला गेले नाही, तसे, त्यांनी कळवलं होतं. तर नरहरी झिरवळ हे रशियाला अर्थात परदेशात असल्याने गैरहजर आहेत. तर आमदार सुनील टिंगरे हेही वैयक्तिक कामानिमित्ताने बाहेर आहेत. राजेंद्र शिंगणे हे आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नाही, तर अण्णा बनसोडे ह्यांनीही वैयक्तिक कामास्तव उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले. अखेर अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला.

अधिक वाचा –
– श्रीरंग बारणेंच्या विजयानंतर मावळात भाजपाचा जल्लोष ! वडगाव आणि तळेगाव शहरात फटाके फोडून मिठाईचे केले वाटप । Maval News
– पवना शिक्षण संकुलात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन’ उपक्रमाची सुरूवात; संस्थेमार्फत 9000 झाडांची होणार लागवड । Pavananagar
– थराराक ! मावळ तालुक्यात दोन गटात हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी । Maval Crime


Previous Post

संजोग वाघेरे यांच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे, नक्की वाचा । Maval Lok Sabha 2024

Next Post

पावसाळा सुरु होतोय ! नागरिकांनो आपले घर आणि परिसर ठेवा स्वच्छ; हिवताप – डेंग्यू सारख्या आजारांपासून करा बचाव

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dengue

पावसाळा सुरु होतोय ! नागरिकांनो आपले घर आणि परिसर ठेवा स्वच्छ; हिवताप - डेंग्यू सारख्या आजारांपासून करा बचाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.