व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना शिक्षण संकुलात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन’ उपक्रमाची सुरूवात; संस्थेमार्फत 9000 झाडांची होणार लागवड । Pavananagar

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून "एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन" या अभिनव उपक्रमाची सुरुवात पवना शिक्षण संकुलात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 6, 2024
in लोकल, ग्रामीण
One Student One Tree Planting

Photo Courtesy : Team Dainik Maval


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन” या अभिनव उपक्रमाची सुरुवात पवना शिक्षण संकुलात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संचालक सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेशभाई शहा, शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांच्यासह सर्व शिक्षक व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलतील प्राथमिक, माध्यमिक शाळा , ज्युनिअर कॉलेज, इंजिनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबतची जागृकता निर्माण होण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संस्थेने यावर्षी प्रत्येक शाळेतील, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ‘वृक्ष’ लागवड करावी तसेच वृक्षसंवर्धन करावे. यासाठी संस्था या वर्षी प्रथमच प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी एक झाड देणार असून त्या विद्यार्थ्यानी ते झाड आपल्या घराच्या अंगणात, शेतात अथवा आपल्या शाळेत लावावे व त्याचे वृक्षसंवर्धन वर्षभर करावे. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन केल्यानंतर वर्ष अखेरीस त्याला संस्थेच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ( Initiation of One Student One Tree Planting initiative at Pavana Education Complex Pavananagar )

संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलातील सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असून संस्था या सर्वांना मोफत देशी आणि पर्यावरणात उपयुक्त महत्वाची अशी रोपे देणार आहे. यावेळी बोलताना संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, सध्या जगात उष्णतेचा उच्चांक गाठला असून ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा पूर्णपणे समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे काळाची गरज झाली त्यासाठी संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

यावेळी बोलताना सोनबा गोपाळे म्हणाले की, शालेय जीवनापासूनच पर्यावरण रक्षण संवर्धन विद्यार्थ्यांवर होण्यासाठी संस्थेच्या वतीने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांना दिलेली रोपे – त्याची लागवड – संवर्धन यासाठी शाळा पातळीवर सक्षम समिती स्थापन करून त्यांना मार्गदर्शन आणि सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

“ कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी ”
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक संस्थेने “ कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी ” हा पर्यावरण पुरक उपक्रम मागील शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आलेला आहे. प्लॅस्टिक मुक्ती करण्यासाठी संस्था संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सी. बी. एस. ई. इंग्लिश मिडीयम स्कुल,अभियांत्रिकी महाविद्यालय मधील एकूण ९,००० विद्यार्थ्यांस व कर्मचारी यांना कापडी पिशवी प्रदान करण्यात आल्या आहेत. यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम. आय. डी. सी., श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे तसेच मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत या सामाजिक शैक्षणिक व सहकार संस्थांनी आमच्या संस्थेस बहुमोल असे सहकार्य केले.

अधिक वाचा –
– कौतूकास्पद ! तळेगाव नगरपरिषदेकडून एकाच दिवशी तब्बल 200 झाडांची लागवड, जागतिक पर्यावरण दिनी राबवला उपक्रम । Talegaon Dabhade
– वडगाव नगरपंचायतीकडून ओढे-नाले यांची साफसफाई, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! मावळच्या जनतेचे केंद्रीय मंत्रिपदाचे स्वप्न होणार पूर्ण, खासदार श्रीरंग बारणे यांचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास पक्के (रिपोर्ट)


Previous Post

थराराक ! मावळ तालुक्यात दोन गटात हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी । Maval Crime

Next Post

श्रीरंग बारणेंच्या विजयानंतर मावळात भाजपाचा जल्लोष ! वडगाव आणि तळेगाव शहरात फटाके फोडून मिठाईचे केले वाटप । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mahayuti celebrate victory of Shrirang Barane

श्रीरंग बारणेंच्या विजयानंतर मावळात भाजपाचा जल्लोष ! वडगाव आणि तळेगाव शहरात फटाके फोडून मिठाईचे केले वाटप । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.