Dainik Maval News : मावळ तालुक्याचा नैसर्गिक परिसर हा सह्याद्रीच्या कुशीत असल्याने येथे वन्यजीवांचा वावर असणे स्वाभाविक आहे, मात्र गेल्या काही काळापासून बिबट्या आढळून आलेले दिसत आहे किंवा खूप वेळा दिसल्याच्या अफवांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. या परिस्थितीचा सखोल अभ्यास केल्यानंतर वनविभाग च्या असे निदर्शनास आले आहे की, अनेक वेळा प्रत्यक्षात रानमांजर, तरस किंवा उदमांजर यांसारखे प्राणी दिसतात, परंतु माहितीच्या अभावामुळे नागरिक त्यांना बिबट्या समजतात.
या चुकीच्या ओळखीमुळे आणि सोशल मीडियावर पसरणाऱ्या असत्य माहितीमुळे गावात विनाकारण घबराट पसरते, ज्याचा परिणाम शेतीकामांवर आणि मुलांच्या शाळेवर होतो. अनेकदा जुने किंवा दुसऱ्या भागातील व्हिडिओ मावळचे सांगून व्हायरल केले जातात, ज्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते आणि प्रशासकीय यंत्रणेवरही कामाचा ताण वाढतो.
या पार्श्वभूमीवर, वनविभाग वडगाव आणि ‘वन्यजीव रक्षक मावळ’ यांची टीम अत्यंत सक्रियपणे काम करत असून गावागावांत जाऊन जनजागृती व कॅमेरा ट्रॅप द्वारे मॉनिटरिंग करत आहे. वन्यजीव रक्षक आणि वन अधिकारी ग्रामस्थांना या संकटाच्या काळात ‘काय करावे आणि काय करू नये’ असे आज बरेच कंपनी मध्ये, गावं मध्ये वनविभाग वडगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल म हिरेमठ, वनरक्षक एस. मोर, पी. कासोले, यो. कोकाटे, मंगल दाते , वनसेवक किसन गावडे व वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे सभासद तुषार सातकर, जिगर सोलंकी, विकी दौंडकर, प्रमोद ओव्हाळ व इतर सदस्य या बाबत सविस्तर मार्गदर्शन करत आहेत.
या मोहिमेत प्रामुख्याने रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडणे, हातात बॅटरी आणि काठी बाळगणे, शेतात जाताना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावणे जेणेकरून आवाजाने प्राणी दूर जातील, यांसारख्या खबरदारीच्या उपायांवर भर दिला जात आहे. वन्यजीव रक्षक मावळची टीम नागरिकांना आवाहन करत आहे की, कोणत्याही प्राण्याची भीती वाटल्यास किंवा तो दिसल्यास स्वतः त्याचा पाठलाग न करता किंवा अफवा न पसरवता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि योग्य खबरदारी घेतल्यास मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळणे शक्य आहे, असे मत या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. मौजे नवलाख उंबरे गावाच्या आजुबाजूचा भौगोलिक प्रदेश हा डोंगर व जंगल व्याप्त असून याच परिसरात MIDC, शेती व वसाहती क्षेत्र असल्याने मानव व वन्यजीव संघर्ष उद्भवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
यासाठी सुरक्षेची काळजी म्हणून पाळीव जनावरे बंदिस्त ठिकाणी ठेवणे. सुरक्षा भिंत जास्त उंचीची बांधणी करणे. रात्री जास्तीत जास्त क्षेत्र प्रकाशमय ठेवणे. भटकी कुत्रेमुक्त व स्वच्छ परिसर ठेवणे, इत्यादी प्राथमिक स्वरूपाचे प्रतिबंधात्मक उपाय करता येतील. तसेच विविध कंपन्याचे विकसन कामे करत असताना राखीव वनहद्दी लगत, धोकादायक पद्धतीने डोंगराचा पाया खोदून काढन्याची आणि सुरुंग व आग लावन्यायाची शक्यता आहे. असे कृत्य आढळ्यास,भारतीय वन अधिनियम 1972 व इतर कायद्याअन्वये संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वनरक्षक एस. के मोरे, वनविभाग वडगाव मावळ यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी

