वडगाव मावळ येथील माळीनगर येथे वडगाव नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक शंकर भोंडवे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘स्व.दिगंबरदादा भेगडे बालोद्यानाचे’ ( DigambarDada Bhegade Children Park ) लोकार्पण माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे हे होते.
‘बालोद्यानाच्या उभारणीतून वडगाव शहर भाजपा आणि नगरसेवक शंकर भोंडवे यांनी खऱ्या अर्थाने स्व. दिगंबर दादांच्या विकासाकार्याला वंदन करून आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे,’ असे बाळा भेगडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘वडगाव शहरातील भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकांचे कार्य कौतुकास्पद असून वडगाव शहराचे नागरीकीकरण होत असतानाच तालुक्यातील थोरा-मोठ्यांनी येथील जडणघडणीत दिलेले योगदान नव्या पिढीला ज्ञात होईल या दृष्टीने स्व.दिगंबरदादा भेगडे बालोद्यानाची संकल्पना पथदर्शी आहे’, असे मत भास्करराव म्हाळसकर यांनी व्यक्त केले.
भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी आपल्या मनोगतात वडगाव शहर भाजपा आणि नगरसेवक शंकर भोंडवे यांच्या कामाचे कौतुक करून सर्वांचे ऋण व्यक्त केले. ‘आजकाल मोबाईल मध्ये हरवलेल्या चिमुकल्यांना मैदानी खेळ माहीत व्हावे, त्यांच्या आरोग्यविकासासाठी त्यांचे पाय मातीला लागावेत या हेतूने आणि स्थानिक नगरसेवकांकडून होत असलेल्या विकासकामांमध्ये खारीचा वाटा उचलता यावा या उद्देशाने बालोद्यानाची उभारणी करत आहे,’ असे स्वीकृत नगरसेवक शंकर भोंडवे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
याप्रसंगी श्रीमती भागुबाई दिगंबरदादा भेगडे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पवार, शिवाजीराव टाकवे, अण्णासाहेब भेगडे, मनोहर भेगडे, माऊलीमामा शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, राजाराम शिंदे, अरविंद पिंगळे, नारायण ढोरे, सुरेश भंडारी, सोमनाथ काळे, यदुनाथ चोरघे, वसंतराव भिलारे, दिपक बवरे , मा उपसभापती दिपालीताई म्हाळसकर, शांताराम कदम, नामदेव भसे, संजय वाडेकर, संघटन मंत्री किरण भिलारे, मा सरपंच नितीन कुडे, सुधाकर ढोरे, संभाजीराव म्हाळसकर, सरचिटणीस मकरंद बवरे, अमोल ठोंबरे, संजय पवार, नगरसेवक दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, प्रविण चव्हाण, गटनेते दिनेश ढोरे, अर्चनाताई म्हाळसकर, मा.नगरसेवक ॲड.विजयराव जाधव, शाम ढोरे, प्रसाद पिंगळे, रविंद्र काकडे, भूषण मुथा, अनिताताई गुरव, शरद मोरे, प्रमोद म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, नामदेव वारिंगे, मदन वारिंगे, ॲड. अजित वहिले, रविंद्र म्हाळसकर, प्रशांत चव्हाण, महेंद्र म्हाळसकर, समीर गुरव, तुषार शिंदे, अंकुश शिंदे, गणेश भालेकर, शेखर वहिले, रमेश ढोरे, अतुल म्हाळसकर, राणीताई म्हाळसकर, महिला मोर्चा अध्यक्ष धनश्रीताई भोंडवे, सपनाताई म्हाळसकर, प्रियंकाताई भोंडवे, कुलदिप ढोरे, बंटी निकम, नितीन गाडे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश भोंडवे यांनी केले.भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सर्वांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– जागरूक नागरिकामुळे वाचले जखमी पक्ष्याचे प्राण, करुंज गावात प्राणीमित्रांकडून लांडोरला जीवदान – पाहा व्हिडिओ
– मावळ तालुक्यात 4 कोटी 46 लाखांच्या पाणी पुरवठा योजनांचे भूमीपूजन । Jal Jeevan Mission