Dainik Maval News : शिवसेनेचे माजी आमदार आणि मावळ तालुक्यातील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक, ( Founder of Pratishirdi Sai Sansthan in Shirgaon Maval Pune) मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे मंगळवारी (दि. 23) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, बुधवार (दि. 24 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वाजता वैकुंठ स्मशानभूमी (पुणे) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
- पुणे जिल्ह्यातील जुन्या पिढीतील कट्टर शिवसैनिक अशी प्रकाश देवळे ( former MLA Prakash Devale Passes Away ) यांची ओळख होती. शिवसेनेचे ते पुणे जिल्हा प्रमुखही होते. शिवसेनेतर्फे 1996 मध्ये त्यांनी विलासराव देशमुख यांचा पराभव करून विधान परिषदेची निवडणूक जिंकली होती. यामुळे त्यांची राज्याच्या राजकारणात चर्चा झाली होती. परंतु यानंतर त्यांनी सक्रीय राजकाणातून स्वतःला बाजूला केले.
प्रकाश देवळे यांनी पुढे स्वतःला सामाजिक आणि आध्यात्मिक कामात जोडून घेतले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिरगाव येथे प्रती शिर्डी या नावाने श्री साईबाबांचे भव्य मंदिर त्यांच्या पुढाकारातून उभारले गेले. शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिराप्रमाणे हुबेहुब हे मंदिर असल्याने, ज्या भाविकांना शिर्डी येथे जाणे शक्य होत नाही, त्यांना मावळ तालुक्यातच शिर्डी प्रमाणे धार्मिक वातावरण अनुभवण्याची संधी मिळाली.
नोकरदार, बांधकाम व्यावसायिक, सिनेमा निर्माते व दिग्दर्शक, राजकारणी ते प्रतिशिर्डीचे शिल्पकार असा प्रकाश देवळे यांचा उल्लेखनीय जीवनप्रवास होता. माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया