भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान मावळ यांचा चौथा वर्धापन दिन दुर्ग इंदोरी या ठिकाणी उत्साहात पार पडला. तसेच वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दुर्गाच्या द्वाराचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक कडजाई मातेच्या मंदिरा पर्यंत आली. त्यानंतर कडजाई मातेची आरती करून पुढील कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या अनेक संस्थांचा या ठिकाणी ऐतिहासिक पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इंदुरी दुर्गाच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या प्रकल्प आराखड्याचे वाचन यात करण्यात आले. या कामात सर्व मावळ वासीयांनी सक्रीय सहभाग घेण्यासाठी सर्वाना आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम स्थळी माँसाहेब वृषालीराजे दाभाडे सरकार, गोरक्षक शिवशंकर स्वामी, स्वराज्य पक्षाचे उपाध्याक्ष विनोदजी साबळे पाटील , शिवभक्त आणि सामाजिक कामात जे अग्रेसर असतात असे विजय तिकोने, सह्याद्री प्रतिष्ठान चे कार्यकारी अध्यक्ष सचिन शेडगे, वन्यजीवरक्षक टीम मावळचे संथापक निलेश गराडे, जिगर सोळंकी, इंदोरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे, थोरले छत्रपति शाहू महाराज पालखी सोहळ्याचे संस्थापक मा प्रमोद भोसले सर, गडभटकंती ग्रुप वडगाव मावळचे किरण चिमटे सर सिंहगड संवर्धन संस्थेचे केदारे सर उपस्थित होते. ( fourth anniversary of bhatkanti sahyadrichi foundation maval was celebrated at Indori Fort )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार..! ब्रेक फेल ट्रकची सहा वाहनांना धडक, अनेकजण जखमी, 1 ठार
– आंदर मावळमधील मुख्य रस्ता असलेल्या टाकवे ते वडेश्वर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ