आपल्या प्रिय नेत्याविषयीच्या भावनांना व्यक्त करायच्या भन्नाट संकल्पना त्याच्या चाहत्या कार्यकर्त्यांच्या मनातील एक छंद असतो. त्यात जर चाहता कलाकार असेल तर तो त्याच्या कलेचा कस लावून एखादी हटके कलाकृती साकारण्याचा जीवापाड प्रयत्न करतो. अशीच एक कलाकृती साकारली आहे ती आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर राहुल ठाकरे या तरुण स्ट्रिंग आर्टिस्टने! ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
करंजगाव (मावळ) येथील विश्वकर्मा पांचाळ समाज ट्रस्ट यांच्या सहकार्यातून मावळचे आमदार सुनिल शेळके यांची नेल्स थ्रेडिंग पोस्टर अर्थात खिळे-धागे विणकाम केलेली प्रतिमा आहे. या चाहत्यांनी रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) तळेगाव दाभाडे येथील आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात ही कलाकृती आमदार शेळके यांना भेट म्हणून सुपूर्द केली. ( Frame gift to MLA Sunil Shelke from a fan )
आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस नुकताच झाला, मात्र त्या दिवशी आपल्या लाडक्या आमदाराच्या उपस्थितीत कोणताही कार्यक्रम नसल्याने या चाहत्यांनी रविवारचा मुहूर्त साधून आमदारांप्रती त्यांच्या असलेल्या भावनेतून ही अनोखी कलाकृती भेट दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष किरण लोहेकर, कलाकृतीकार राहुल ठाकरे, दिलीप सुतार, उमेश तंबोरे, प्रदीप तंबोरे, गणेश गाडे, गणेश सुतार, विश्व सुतार, गणेश तंबोरे, सोनल आनंदे, संतोष आनंदे, नामदेव गराडे, शिवप्रसाद सुतार, चिमणराव तंबोरे, सहादु तंबोरे, बाळासाहेब तंबोरे, बबनराव तंबोरे, बाळासाहेब सुतार, नाथा तंबोरे, दत्ता तंबोरे, बाळासाहेब गरुड, दशरथ सुतार आदी उपस्थित होते.
यावेळी या अप्रतिम भेटीविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आमदार शेळके म्हणाले, ‘आपल्या माणसांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे नेहमीच ऊर्जा देत असतात. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी असलेल्या कर्तव्याची जाणीवही सतत करुन देतात. विश्वकर्मा पांचाळ समाज ट्रस्ट करंजगावच्या माझ्या मावळ्यांनी राहुल सारख्या कलाकाराला प्रोत्साहन देत तयार केलेल्या या पोस्टर मधील प्रत्येक खिळा आणि त्यात गुंफलेल्या धाग्यांसारखे आपले हे नाते अतूट राहील.’
अधिक वाचा –
– ‘पवना नदी प्रदूषणला महापालिका अधिकारी जबाबदार; कारवाई करा, अन्यथा जनहित याचिका’ – खासदार श्रीरंग बारणे
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी पुन्हा ब्लॉक, कुठे आणि किती वाजता असणार ब्लॉक, लगेच वाचा
– दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटपास सुरु, मावळ तालुक्यात 37 हजार शिधा संचाचे होणार वाटप