आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसकडून संघटना बांधणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि. 8 नोव्हेंबर) तळेगाव दाभाडे इथे ही बैठक पार पडली. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यावेळी सचिन सावंत यांसह काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रामदास काकडे, चंद्रकांत सातकर, यशवंत मोहोळ, राजेश वाघोलेंसह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुका काँग्रेस पक्षाची आगामी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांसंदर्भात आढावा बैठक प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, पुणे शहर कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कैलास कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पैलवान चंद्रकांत सातकर, काँग्रेसचे नेते उद्योजक रामदास काकडे, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंतराव मोहोळ, शहराध्यक्ष – लोणावळा, देहूरोड, देहू, तळेगाव, वडगाव, कामशेत उपस्थित होते. तसेच महिला युवक आणि तालुका काँग्रेसचे सर्व सेलचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठकीला उपस्थिती होती. ( Maval Taluka Congress Committee review meeting In Presence of MLA Ravindra Dhangekar Sachin Sawant )
अधिक वाचा –
– पाणी योजनांसाठी जागा उपलब्ध होत नसलेल्या 13 गावांतील गावकऱ्यांना आमदार सुनिल शेळकेंचे जाहीर आवाहन, वाचा
– ‘पवना नदी प्रदूषणला महापालिका अधिकारी जबाबदार; कारवाई करा, अन्यथा जनहित याचिका’ – खासदार श्रीरंग बारणे
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी पुन्हा ब्लॉक, कुठे आणि किती वाजता असणार ब्लॉक, लगेच वाचा