दिवाळीच्या सुरुवातीला येणारा ‘वसुबारस’ हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. ह्या लेखात आपण वसुबारस का आणि कशी साजरी करतात, ते जाणून घेऊयात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वसूबारसची कथा काय आहे?
समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे, तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनांपुरतीसाठी ही पूजा केली जाते. तसेच असे म्हणतात की, या दिवशी श्री विष्णूंची आपतत्त्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते. ह्या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अवतरित करते. म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते.
- आपला देश कृषिप्रधान असल्याने वसुबारस या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. “गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत, असे मानले जाते.” म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली.
काय आहे वसुबारसची प्रथा?
ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी (शेतीत) उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पध्दत आहे. ( Why Vasubaras Celebrate In Diwali )
अशी साजरी करा वसुबारस –
वसुबारस या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. गायीच्या पायावर पाणी टाकावे. गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. वासराची अशारितीने पूजा करावी. निरांजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श करावे. गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी. ( Know First Festival of Diwali Is Vasu Baras )
अधिक वाचा –
– वडगाव शहरात भाजपातर्फे मतदार नोंदणी अभियान; पाहा शहरात कधी आणि कुठे होणार शिबिर?
– पाणी योजनांसाठी जागा उपलब्ध होत नसलेल्या 13 गावांतील गावकऱ्यांना आमदार सुनिल शेळकेंचे जाहीर आवाहन, वाचा
– ‘पवना नदी प्रदूषणला महापालिका अधिकारी जबाबदार; कारवाई करा, अन्यथा जनहित याचिका’ – खासदार श्रीरंग बारणे