भाजपा मावळ विधानसभा मार्फत संपूर्ण मतदारसंघात शहरात आणि गावोगावी मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शहरे आणि प्रमुख गावांत हे अभियान राबवण्यात येत आहे. लोणावळा, कामशेत, तळेगाव नंतर आता वडगाव मावळ शहरात भाजपा तर्फे मतदान नोंदणी अभियान होणार आहे. गुरुवार 9 नोव्हेंबर आणि शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी हे मतदार नोंदणी अभियान होत आहे. याबाबत भाजपाकडून प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )

“वडगाव मावळ शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, उद्या गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर ते शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रशासनाला मदत म्हणून एक हात मदतीचा मतदार नोंदणीचा हे अभियान, कार्यक्रम चावडी चौक वडगाव येथे होणार असून, भारतीय पार्टी मावळ विधानसभा व वडगाव शहराच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे, तरी वडगाव शहरातील युवक – युवती व नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेऊन मतदार नोंदणी करून घ्यावी,” असे आवाहन मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी पुन्हा ब्लॉक, कुठे आणि किती वाजता असणार ब्लॉक, लगेच वाचा
– दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटपास सुरु, मावळ तालुक्यात 37 हजार शिधा संचाचे होणार वाटप
– काँग्रेस (आय) पक्षाच्या मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्षपदी बंडोबा मालपोटे यांची नियुक्ती