Dainik Maval News : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी (दि.12) सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात, एका ट्रेलरने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कंटेनर, टेम्पो, ट्रेलर या तीन वाहनांना जोरदार धडक. यामुळे झालेल्या भीषण अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सकाळी साडेदहाच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे निघालेला ट्रेलर (क्रमांक एचआर 39 इ 5203) हा बोरघाटात किमी 39 जवळ आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कंटेनर (क्रमांक एमएच 46 बीएम 1106) याला पाठीमागून जोरदार धडक दिली. तर पुढे असणाऱ्या टेम्पो आणि ट्रेलर यांनाही धडक बसली. या धडकेमुळे ट्रेलरच्या केबिनचा चक्काचूर होऊन त्यातून खाली पडलेला चालक पवन कुमार (वय 25) हा गतप्राण झाला. तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
अपघातस्थळी महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट येथील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने दाखल झाले. एमएसआरडीसीच्या देवदूत यंत्रणेने मृतदेह बाहेर काढला आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात पुढील तांत्रिक प्रक्रियेसाठी पाठविला. डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांनी अपघातात मदतकार्य केले. खोपोली पोलीस स्टेशनचे हद्दीत हा अपघात घडला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गव्हाणपूजन व मोळी पूजन समारंभ उत्साहात संपन्न
– ‘सुनील जी आप जरूर जितोगे’ , पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आमदार सुनिल शेळकेंना आशीर्वाद ! ‘विजयी भव’ म्हणत दिल्या शुभेच्छा
– बापूसाहेब भेगडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबन, सुनिल शेळकेंविरोधात बंडखोरी केल्याने कारवाई । Maval News