व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मी कधीही श्रेय घेतलं नाही, विकासकामांचे भूमिपूजन – उद्घाटन देखील ज्येष्ठांच्या महिलांच्या हस्तेच केलंय’ – आ. शेळके

आज गावोगावी फिरणारे नेते कोरोना महामारीच्या संकटकाळात कुठे होते, त्यांनी जनतेसाठी काय केले. - सुनिल शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 13, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Taluka Assembly Constituency Mahayuti candidate MLA Sunil Shelke Prachar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आज गावोगावी फिरणारे नेते कोरोना महामारीच्या संकटकाळात कुठे होते, त्यांनी जनतेसाठी काय केले, हा प्रश्न निश्चितच मावळ तालुक्यातील जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.

2019 पूर्वी दहा वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी या मावळ तालुक्याच्या विकासासाठी काय केले, ते त्यांनी या प्रचारादरम्यान सांगावे. मात्र सांगण्यासारखे काही नसल्याने केवळ सुनील शेळके यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे टीका-टिप्पणी करणे हाच एक कलमी कार्यक्रम विरोधकांकडून राबविला जात आहे, असा आरोप शेळके यांनी केला.

सत्तेच्या माध्यमातून विकासकामे
2016 सालापासून मी या मावळ तालुक्यामध्ये फिरत असताना तालुक्यातील रस्ते, पाणी या समस्या मला दिसत होत्या. त्या सोडवण्यासाठी मी त्याकाळी वैयक्तिक स्वरूपात प्रयत्न केले. मात्र ते प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचे असतील तर सत्ता असणे गरजेचे आहे. याकरिता 2019 ची निवडणूक लढवली व निवडून आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये निधी देत त्या त्या भागातील समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, अशी माहिती शेळके यांनी दिली.

विकास कामांचे लोकर्पणही नागरिकांच्याच हस्ते
मावळ तालुक्यामधील रस्ते असतील, जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याच्या समस्या असतील, या सोडवण्याचे काम केले. तालुक्यात दोन उपजिल्हा रुग्णालये उभी केली. सर्व शासकीय कार्यालये उभी रहात आहेत. जनतेला येत्या काळात वडगाव येथे आल्यावर एकाच ठिकाणी सर्व शासकीय सुविधा मिळणार आहेत. तुमच्याकडे सत्ता होती तुम्ही जनतेसाठी हे का केले नाही. मी हे करत असताना कोठेही श्रेय न घेता त्या त्या भागातील जेष्ठ व्यक्ती असतील महिला असतील यांच्या हस्ते त्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटने केली. हे सर्व माझ्या मावळ तालुक्यातील जनतेला माहीत आहे, असे आमदार शेळके म्हणाले.

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका
काही स्वार्थी नेते मंडळी तालुक्यात विविध भागात जाऊन सर्वसामान्य नागरिकांची माथी भडकवण्याची कामे करत आहेत. मात्र मी माझ्या मतदार बंधू भगिनी व माता-भगिनींना सांगू इच्छितो की, येणाऱ्या काळामध्ये मावळ तालुक्याच्या विकासाला आपण मत द्या, मावळ तालुक्याचा विकास थांबवण्याचे काम या विरोधकांकडून सुरू आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गव्हाणपूजन व मोळी पूजन समारंभ उत्साहात संपन्न
– ‘सुनील जी आप जरूर जितोगे’ , पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आमदार सुनिल शेळकेंना आशीर्वाद ! ‘विजयी भव’ म्हणत दिल्या शुभेच्छा
– बापूसाहेब भेगडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबन, सुनिल शेळकेंविरोधात बंडखोरी केल्याने कारवाई । Maval News


Previous Post

माझ्या मावळातील मायबाप जनतेला गरज होती, तेव्हा तुम्ही कुठे होता? ; आमदार सुनील शेळके यांचा विरोधकांना सवाल

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
freak accident involving four vehicles on Mumbai-Pune Expressway driver died on spot

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.