पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी (दिनांक 27 एप्रिल) दुपारी विचित्र अपघात झाला. अपघातात एकूण 12 वाहने एकमेकांना धडकली. ज्यात एक कार तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी होती. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र अनेकजण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. खोपोली पोलिस, महामार्ग पोलिस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, आयआरबी, देवदूत यंत्रणा यांसह इतर रेस्क्यू टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले. ( Freaky accident involving 12 vehicles on Pune Mumbai expressway watch horrifying video )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी’, तळेगाव शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील 39 आदिवासी बांधवांना मोफत जातीचे दाखले वाटप