Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील महिलांसाठी मोफत ‘गर्भाशय आरोग्य तपासणी शिबिर’ यशस्वीरित्या पार पडले. प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे, प्रयास संस्था, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे आणि गेस्टम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य विभागाचे दिलीप ठोंबरे व डॉ. नागेश ढवळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली पवार यांनी केले, तर ऋषिकेश डिंबळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मोबीन बेग यांनी महिलांना तपासणीपूर्वी आरोग्य जनजागृती व मार्गदर्शन केले.
सदर शिबिरात २०० हून अधिक महिलांचा सहभाग होता, ज्यात ३३ गावांतील कातकरी आदिवासी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ३० वर्षांवरील पात्र महिलांची तपासणी करण्यात आली. दुर्गम भागातील महिलांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
सुयोग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि महिलांमधील जागरूकतेमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. डॉ. नागेश ढवळे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले, तर स्थानिक महिलांनी अशा आरोग्यविषयक शिबिरांची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. हा उपक्रम ग्रामीण व आदिवासी महिलांच्या आरोग्य जागरूकतेसाठी एक सकारात्मक पाऊल ठरला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर