मावळ तालुक्यातील सिद्धांत औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सुदुंबरे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर पार पडले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) आणि पुरंदर ब्लड बँक व साई ऑप्टिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात हे नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर संपन्न झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सदर शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सदर शिबिराला संस्थेचे व्यवस्थापक मिहीर यादव आणि शनन यादव यांनी प्रोत्साहन दिले होते. शिबीर प्रसंगी पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल डुंबरे, पदविका प्राचार्य बी.व्ही. मठदेवरू, अधिक्षक नवनाथ गाडे, विभाग प्रमुख डॉ. स्वाती देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांना रोपे देऊन सत्कार केला. ह्या शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सुत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वाती काळे यांनी केले. (Free Eye Checkup and Blood Donation Camp at Siddhant College of Pharmacy Sudumbare)
अधिक वाचा –
– वडगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा जाहीर, शहराच्या 20 वर्षांच्या विकासाचे नियोजन । Vadgaon Maval
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांमध्ये साकव पुलांसाठी एकूण 2 कोटी 60 लाखांचा निधी, पाहा संपूर्ण यादी । Maval News
– लोणावळ्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का! उपशहरप्रमुखांसह अनेकांचा एकनाथ शिंंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News