Dainik Maval News : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा सध्या 27 वा गाळप हंगाम सुरू असून गाळपासाठी ऊसतोड कामगार चाळीसगाव, बीड, पाथर्डी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि जालना येथून आलेले आहेत. त्यांच्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.
साखर कारखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र माण उपकेंद्र नेरे यांच्या संयुक्त विद्यमाने, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड कामगार व कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य शिबिरामध्ये एकूण 145 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कारखान्याचे लेखापाल संतोष दाभाडे, हिरामण गोपाळे, रवींद्र नवले, डॉ बालाजी लोनावडे, किरण वाघोले, अमोल घोटकुले, डॉ मायादेवी गुजर, डॉ वैशाली पाटील, डॉ सोनाली पाथरीकर, डॉ दिपाली कांबळे, डॉ अर्चना घोडके, डॉ राम कणके, डॉ स्नेहा कारकर, डॉ नमिता पाटकर, डॉ प्रीती राठोड यांचे सहकार्य लाभले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड