मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या कोथूर्णे गावातील वाघजाई वस्ती आणि चिंचवाडी इथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील कातकरी समाजातील आदिवासी मुलांना आणि अन्य काही विद्यार्थी अशा एकूण 50 विद्यार्थ्यांंना ‘खुशी के रंग’ फाऊंडेशन आणि ‘स्पंदन’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्कूल कीटचे वाटप करण्यात आले. ह्या कीटमध्ये स्कूल बॅग, 4 वह्या, चित्रकला वही, रंगीत खडू, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाउच इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. ( free school kits were distributed to 50 tribal students at Kothurne by Spandan and Khushi Ke Rang Foundation )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संविधानाने सर्वांनाच शिक्षणाच्या मूलभूत अधिकार सोपवला. परंतू मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अत्यंत कठीण जातं. अशातच शालेय साहित्यांसाठी संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडे पैसे नसतात. त्यामुळे फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही मोलाची मदत करण्यात आली. “शिक्षणविषयक जनजागृती नसल्याने आदिवासी कातकरी मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. परंतु या मुलांना अशा विविध संस्थानी वेळोवेवेळी मदतीचा हात दिल्यास या मुलांमध्ये देखील शिक्षणाची गोडी निर्माण होईल,” असे मत शाळेचे मुख्याध्यापक नितीन वाघमारे यांनी व्यक्त केले.
खुशी के रंग फाऊंडेशन मार्फत राज्यभर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अशाप्रकारची मदत करण्याचे काम गेली 8 वर्षे अविरतपणे सुरू आहे. आम्हाला भविष्यात अनेक ए. पी. जे. अब्दुल कलाम घडवायचे आहेत आणि म्हणुनच त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन ‘एक कदम कलम से कलाम की ओर’ असा उपक्रम हाती घेतल्याचे खुशी के रंग फाऊंडेशनचे निलेश शिंगे यांनी यांनी सांगितले.
आदिवासी मुलांच्या चेहर्यावरील आनंद पाहून सर्वांनी योग्य ठिकाणी मदत झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी निलेश शिंगे, श्रद्धा अहिरराव (राजगुरु), राजेंद्र राजगुरू, स्पंदन फांउडेशन चे संस्थापक धर्मेंद्र ठाकर, मुख्याध्यापक नितीन वाघमारे, मधुकर दळवी, आणि अंगणवाडी सेविका सुनंदा निंबळे आदि उपस्थित होते. ( free school kits were distributed to 50 tribal students at Kothurne by Spandan and Khushi Ke Rang Foundation )
अधिक वाचा –
– व्वाह पोराहो…शाब्बास!! शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत भोयरे शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश
– लोणावळ्यात चोरीच्या घटनेतील आरोपी 12 तासात गजाआड; शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई