Dainik Maval News : भूमिपुत्र संघर्ष समितीचे संस्थापकअध्यक्ष ॲड. सागर शेटे यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलाख उंब्रे येथील 450 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वाह्य तसेच इतर शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी नवलाख उंब्रे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शांताराम बापू नरवडे, नवलाख उंब्रे वि.का. सोसायटीचे चेअरमन सोमनाथ पडवळ, केंद्रप्रमुख मा. इंदोरे सर, मार्गदर्शक ज्ञानेश्वरजी जगनाडे, श्रीराम विद्यालय शाळा व्यवस्थापन समितीचे सुरेश बाजीराव शेटे, ॲड. सागर एकनाथ शेटे, युवा नेते संग्राम कदम, मा. अध्यक्ष विशाल विठ्ठल शेटे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गोपीनाथ शेटे, ह.भ.प. नितीन महाराज शिर्के उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना चव्हाण, उद्योजक नवनाथ नरवडे, उदयोजक रामनाथ शेटे, उद्योजक दत्ताभाऊ बबन शेटे, उद्योजक शत्रुघ्नभाऊ शेटे, चावसरवस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पडवळ, उद्योजक माऊली शेटे, समितीचे कार्याध्यक्ष महेश चंद्रकांत शेटे, उदयोजक राजूभाऊ शेटे, उपाध्यक्ष सुरेश निवृत्ती पडवळ, उद्योजक रोहितभाऊ नरवडे, युवा नेते स्वप्निल आप्पासाहेब शेटे,भूमिपुत्र समितीचे सचिव विजयभाऊ अरूण शेटे, उद्योजक विशालशेठ घोलप, उद्योजक विकास अर्जुन शेटे, उद्योजक संतोष बंडू शेटे, उद्योजक अशोक वसंत शेटे, उद्योजक शुभम मराठे, उद्योजक विशाल बबुतात्या पडवळ, उद्योजक संतोष बबन शेटे, अमोल वाळुंज, विक्रम जगनाडे यांसह नवलाख उंब्रे शाळेमधील मुख्याध्यापक मॅडम, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्हा घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, मावळात रात्रीपासून जोरदार पाऊस
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली, पोलिसांचे सपशेल दूर्लक्ष । Maval News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी

 
			






