व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; २१ तारखेपर्यंत सूचना व हरकती नोंदविता येणार । Vadgaon Maval

काही हरकती, सूचना असल्यास २१ ऑगस्टपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 20, 2025
in मावळकट्टा, लोकल, शहर
Vadgaon-Nagar-Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत औद्यागिक नगरीत अधिनियम अंतर्गत वडगाव नगरपंचायतीची प्रारूप प्रभागरचना व प्रभाग संख्या निश्चित करण्यात आली आहे. याबाबत काही हरकती, सूचना असल्यास २१ ऑगस्टपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.

Novel NIBR Ads

वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी शासनाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभागरचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवली होती. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर आज प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी करण्यात आली असून, हरकती व सूचना असल्यास दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार, वडगाव नगरपंचायत हद्दीत पूर्वीप्रमाणेच १७ प्रभाग असून, रचनेमध्येही फारसा बदल झालेला दिसत नाही. तसेच प्रभागांची व सदस्यांची संख्याही १७ असल्याचे यामुळे निश्चित झाले आहे. हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होणार असून, त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यावर अंतिम प्रभाग रचना २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष –
वडगाव नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर सन २०१८ मध्ये पहिली निवडणूक झाली. त्या वेळी जशी प्रभागरचना करण्यात आली होती, तशीच प्रभागरचना या वेळी कायम राहिली आहे. त्यामुळे आता फक्त आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस, 24 तासांत विक्रमी 432 मिलिमीटर पावसाची नोंद; आज शाळा, कॉलेजेस बंद । Lonavala Rain
– आनंदाची बातमी ! पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू । Pawana Dam Updates
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

नवलाख उंबरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील साडेचारशे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप । Maval News

Next Post

VIDEO : पवना नदीकाठी अडकलेल्या महिलेच्या सुटकेचा थरार ; मध्यरात्री केले रेस्क्यू ऑपरेशन – पाहा व्हिडिओ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Thrilling rescue of woman stranded on the banks of Pawana river Watch Video

VIDEO : पवना नदीकाठी अडकलेल्या महिलेच्या सुटकेचा थरार ; मध्यरात्री केले रेस्क्यू ऑपरेशन - पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.