आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने मावळ विधानसभेतील विशेषतः ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घर ते परीक्षा केंद्र अशी मोफत वाहतुक सेवा सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सलग सातवे वर्ष असून दरवर्षी या उपक्रमाचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची बोर्ड परिक्षा शुक्रवारपासून (दि. 1) सुरु झाली. मावळ विधानसभेतील तेरा परीक्षा केंद्रावर यंदा 6668 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे आवश्यक असते. परंतु इतर वाहतूक व्यवस्था वेळेवर उपलब्ध होण्याची शाश्वती नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, ही समस्या ओळखून मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून सन 2016-17 पासून तालुक्यातील विविध भागातून घर ते परीक्षा केंद्र अशी मोफत वाहतुक सेवा सुरु करण्यात आली आहे. ( free transport service for ssc exam students of class 10 of Maval constituency through mla sunil shelke )
आंदर मावळ,पवन मावळ, नाणे मावळ भागातील कामशेत, माळेगाव, तुंग,कुसवली, वहाणगाव, वारु, वडेश्वर,दिवड,पाथरगाव, सांगिसे, टाकवे, पवनानगर, कान्हे, कार्ला,शिवणे,बौर,ओझर्डे, पाचाणे, कुरवंडे आदी गावांमधून विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्या-येण्यासाठी सुमारे दिडशे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही आहेत परिक्षा केंद्रे –
तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परुळेकर केंद्रावर 1062 विद्यार्थी, परांजपे विद्या मंदिर 792, श्री शिवाजी विद्यालय देहूरोड 289 विद्यार्थी, सेंट ज्युड हायस्कूल 469,न्यु इंग्लिश स्कूल वडगाव 776,पवना विद्यामंदिर 441,पंडित नेहरु माध्यमिक विद्यालय कामशेत 604,न्यु इंग्लिश स्कूल चांदखेड 328, डॉ.बी.एन.पुरंदरे विद्यालय लोणावळा 352, ॲड.बापुसाहेब भोंडे विद्यालय लोणावळा 684, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल 366, संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र 75 अशा एकूण तेरा परिक्षा केंद्रावर 6668 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत.
भवितव्याच्या दृष्टीने शालेय जीवनातील महत्त्वपूर्ण असलेली दहावीची परिक्षा विद्यार्थी देत आहेत.विद्यार्थी इतर वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहिल्यास परिक्षेला उशीर होऊन शैक्षणिक नुकसान होण्याची संभावना असते. घरापासुन परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचले पाहिजे. तसेच परिक्षेच्या काळात मुलांना अभ्यासासाठी अधिक वेळ देखील मिळाला पाहिजे. अशा तणावमुक्त अभ्यासासाठी व मुलांच्या उज्वल यशासाठी आमदार सुनिल शेळके यांनी मोलाचा हातभार लावल्याबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा –
– सुर्य तापला… कडक उन्हामुळे मावळ तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यात घट, पाहा कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?
– मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीतील दादा गटाला खिंडार, एक दोन नव्हे तब्बल सव्वाशे पदाधिकाऱ्यांचा राजीनामा । Lonavala News
– आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, पवनानगर केंद्रावर दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण । SSC Exam 2024