जळगावमध्ये पुतळ्याची नासधूस केल्याने 2 गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी 12 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. ( Fresh Clash Between Two Groups In Maharashtra Jalgaon After Statue Vandalised 12 Detained )
जळगावचे एसपी एम राजकुमार यांनी याबाबत माहिती दिली. “जळगाव जिल्ह्यातील अट्रावल गावात अज्ञात व्यक्तींनी पुतळ्याची नासधूस केल्यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. शनिवारी दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर तब्बल 12 जणांना ताब्यात घेण्यात आले,” अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुतळ्याच्या तोडफोड नंतर एफआयआर नोंदवण्यात आले असून सध्या परिस्थिती शांततापूर्ण असून परिसरात नियंत्रणात आहे. एका मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून गटांमध्ये मतभेद झाल्यानंतर हे प्रकरण वाढले ज्यामुळे आता हाणामारी झाली, असे जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
Maharashtra | A clash broke out between two groups in Atarwal village of Jalgaon district after a statue was vandalised by unidentified people
Police reached the spot & brought the situation under control. 12 people detained. Further action is being taken: M Rajkumar, SP Jalgaon… pic.twitter.com/DdsiwN9F6q
— ANI (@ANI) April 1, 2023
दिनांक 30 मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात नमाज सुरू असताना मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली होती. हा वाद मोठा वाढला होता. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तब्बल 54 जणांना ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा –
– बिग ब्रेकिंग! मावळ तालुका हादरला… शिरगाव गावचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांची भरचौकात हत्या
– मोठी बातमी : ‘दिल्लीत ये, तुला उडवून टाकतो’, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी