Dainik Maval News : जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मावळ तालुक्यातील दोन गावांतील विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रम सन २०२५ – २०२६ या योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील दलित वस्तीला जोडणाऱ्या साकव कामांसाठी तब्बल ८१ लाख ७५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
सदर मंजूर निधीतून ओव्हळे गावातील दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव बांधणे आणि मौजे शिवली अंतर्गत आंबेवाडी येथे दलितवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव बांधणे ही दोन कामे केली जाणार आहे. त्यासाठी अनुक्रमे ४८ लाख १२ हजार आणि ३३ लाख ६३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
आमदार सुनील शेळके यांनी याबद्दल माहिती दिली असून या कामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सोय होणार असून, विकासाचा वेग अधिक वाढणार असल्याचे सांगितले. तसेच उपलब्ध निधीबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम