Dainik Maval News : राज्यातील जिल्हा परिषद शाळांना थकीत वीज बिलाची रक्कम अदा करता यावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून 2 कोटी 28 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळासाठी भौतिक, शैक्षणिक सुविधा य दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या 4 टक्केपर्यंत सादिलवार खर्च करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या माहे जुलै, 2024 पर्यंतच्या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी 11 कोटी 11 लाख इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
- प्राथमिक शिक्षण संचालकांनी उर्वरित 18 जिल्ह्यांसाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी मिळालेली आहे. हा निधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांना अदा करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्याकडे सुपूर्त करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
निधी ज्या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे, त्याच कामासाठी खर्च करावा लागणार आहे. यापूर्वी दिलेले अनुदान पूर्ण खर्च झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरीत करण्यात येऊ नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाच्या कार्यासन अधिकारी स्मिता देसाई यांनी दिल्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान