श्री दत्त जयंती निमित्त पुनावळेहून खोपोलीच्या दिशेने निघालेल्या श्री गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे आज, मंगळवार (दि. 26 डिसेंबर) रोजी वडगाव शहरात श्री खंडोबा मंदिर इथे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. हलगीच्या कडकडाटात ज्योतीचे आगमन झाले. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष अतुल राऊत यांच्या हस्ते ज्योतीचे खंडोबा मंदिरात स्वागत करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचे आणि पायी ज्योत सोहळ्यातील भाविकांचे स्वागत केले. याप्रसंगी श्री दत्त गगनगिरी सेवा मंडळांचे मार्गदर्शक संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक सुदेश वाघमारे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष सुधाकर वाघमारे, कामगार नेते हेमंत कोयते, नगरसेवक मंगेश खैरे, ॲड अजित वहिले, जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष सौरभ सावले, तुषार वहिले, संतोष खैरे, सचिन ढोरे, शैलेश वहिले, हभप विठ्ठलराव ढोरे, पंकज भामरे, रोहित गिरमे, अभिषेक ढोरे आदी उपस्थित होते. यावेळी जय मल्हार ग्रुपच्या वतीने सर्व उपस्थित भाविकांना सुगंधी दूध वाटण्यात आले. ( gagangiri maharaj payi Jyot welcomed by devotees at vadgaon maval )
अधिक वाचा –
– होणाऱ्या नवऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीची आत्म’हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार!
– वडगावमध्ये झालेल्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश । Vadgaon Maval
– ‘मावळ लोकसभेची जागा ठाकरे गटच लढवणार’, सचिन अहिर यांनी ठणकावून सांगितले, वाचा सविस्तर