व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळ लोकसभेची जागा ठाकरे गटच लढवणार’, सचिन अहिर यांनी ठणकावून सांगितले, वाचा सविस्तर

मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मातोश्री इथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 26, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Maval-Lok-Sabha-shhivsena

Photo Courtesy : FB / Sachin ahir


मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मातोश्री इथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी संजय राऊत, मावळ लोकसभा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि मावळ लोकसभेतील इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघ हा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी कळीचा मुद्दा ठरणार, असे दिसत आहे. याचे कारण शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजपा हे सर्वच पक्ष मावळ मतदारसंघावर आपला दावा सांगत आहेत.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर संपन्न झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी मावळ लोकसभेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भुमिका स्पष्ट केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘मावळ लोकसभेची जागा ठाकरे गटच लढवणार’

“मावळ लोकसभेची सीट हा आमचा अधिकार आहे. काहीही झालं तरीही कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही ही सीट निवडून आणू, असा विश्वास आम्ही उद्धव ठाकरे यांना दिला आहे. या मतदारसंघात पक्षाची स्थिती भक्कम आहे. आमच्या पक्षात आणि पक्षाच्या बाहेरूनही पक्षाच्या बाजूने लढण्यासाठी अनेक मात्तबर इच्छुक उमेदवार आहे. या सर्वाच्या जोरावर आम्ही मावळ लोकसभेचा जागा लढवू आणि जिंकून आणू. येत्या 21 तारखेला आदित्य ठाकरेंचा मावळ लोकसभेत दौरा होणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंची सभाही मावळ मतदारसंघात होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसमवेत बैठक पार पडली. ज्यात ही जागा जिंकून आणण्यासाठी महत्त्वाची चर्चा झाली. तसेच उमेदवार कोण द्यायचा याबाबत लवकरच निर्णय होईल”, अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली. ( Maval Lok Sabha Constituency Election 2024 Shiv Sena Thackeray group will give candidate Sachin Ahir )

अधिक वाचा –
– मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा
– अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली आमदार शेळकेंची भेट; आमदारांनी दिला मोलाचा सल्ला!


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात व्यापाऱ्यांवर झालेल्या मारहाणप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

वडगावमध्ये झालेल्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shivdurg-Fitness-Club-lonavala

वडगावमध्ये झालेल्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.