व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा

महाविकास आघाडीतील मिञ पक्ष "काँग्रेस - शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब, आरपीआय निकाळजे गट" पदाधिकारी यांची बैठक तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 25, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-Taluka-Mahavikas-Aghadi

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीने सद्य परिस्थितीत मावळ तालुक्यात चालू असलेल्या अनेक चुकीच्या कामाबाबतीत तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी व भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी एकत्र महाविकास आघाडीतील मिञ पक्ष “काँग्रेस – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब, आरपीआय निकाळजे गट” पदाधिकारी यांची बैठक तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील नागरिकांचे न सुटणारे विविध प्रश्न, शेतकऱ्याची व्यथा यावर एकत्रित आंदोलन उभारणे, महिलांचे प्रश्न सोडवणे, विविध शासकीय योजना, चालू असलेला कामातील भ्रष्टाचार, प्रशासनातील अरेरावीपणा, येणाऱ्या पुढील काळातील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका एकत्रित पणे लढविणे अशा महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दिनांक 27 ते 30 डिसेंबर रोजी खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा मध्ये सहभागी होण्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना सरकारच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी ताकद देण्यात येईल असे आश्वासन सर्व प्रमुख पदाधिकारी माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रामदास काकडे, दिलीप ढमाले, शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवक काँग्रेस मा तालुकाध्यक्ष गणेश काजळे, मा. नगराध्यक्ष प्रमोद गायकवाड ,रोहिदास वाळुंज आदींनी मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढोरे, उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, शादानभाभी चौधरी, जयश्री पवार, पुष्पा भोकसे, किसन कदम, राजेश वाघोले, सुनिल शिंदे, मदन शेडगे, शांताराम भोते, मिकी कोचर, बारकू ढोरे, पांडुरंग दाभाडे,, संभाजी राक्षे, सुधाकर वाघमारे, कैलास पवार,भरत राजीवडे, गफूरभाई शेख, मधुकर कंद, नासिर शेख, मारुती आडकर, सहादू आरडे, रमेश घोजगे, योगेश चोपडे, आदिनाथ मालपोटे, अक्षय मुऱ्हे, शंकर मोढवे, नवनाथ केदारी, सोपान पवार, वैभव कार्ले,प्रतिक घोजगे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. काँ. पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, प्रास्ताविक मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, स्वागत काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, आभार रा. काँ. युवक अध्यक्ष विशाल वहिले यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Maval Taluka Mahavikas Aghadi meeting at talegaon dabhade Discussion on upcoming elections )

अधिक वाचा –
– शेतात जाणारा रस्ता अडवलाय? थेट तहसीलदारांकडे करा तक्रार; प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असावा असा ‘मामलेदार कोर्ट कायदा’
– मावळ लोकसभेसाठी भाजपाने कंबर कसली! पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न, निवडणूकीसाठी केले खास नियोजन
– दैनिक मावळ ‘संवाद’ : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले यांच्यासोबत खास बातचीत


dainik maval jahirat

Previous Post

अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता

Next Post

मोठी बातमी! पवनानगर भागातील जुगार अड्ड्यांवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

मोठी बातमी! पवनानगर भागातील जुगार अड्ड्यांवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.