मावळ तालुक्यात वडगाव फाटा इथे उर्से रोड परिसरात असणाऱ्या ओम साई एंटरप्राईस या कंपनीत वायू गळती झाल्याने परिसरात रसायनमिश्रीत वायूच्या धूराचे लोट पसरले होते. रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. परंतू अग्निशमन दल, आपदा मित्र आणि वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांनी वेळीच बचावकार्य केल्याने संभाव्य धोका टळला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सोमवार दिनांक 26 जून रोजी रात्री साधारण 10:30 च्या सुमारास वडगाव फाटा परिसरात प्रचंड धुराचा लोट दिसत असून एखादा केमिकल कंटेनर पलटी झाला असावा असा फोन वडगाव वाहतूक विभागाकडून एमआयडीसी अग्निशामक तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला आला असता. तेव्हा त्या ठिकाणी अग्निशमन विभागाचे दिपक दोरुगडे व स्टाफ यांनी त्वरित त्या ठिकाणी पोहचून परिस्थितीचे पाहणी केली. ( Gas leak at Om Sai Enterprise Company in Vadgaon Phata Urse Road area of Maval Taluka )
सीआरपीएफ पासून अनेक भागात संपूर्ण धूर पसरलेला होता, तसेच केमिकलच्या वासामुळे वाहन चालवणे देखील अवघड होते. अशा परिस्थितीमध्ये एमआयडीसी विभाग तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद, आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अनेक सदस्य त्या ठिकाणी पोहोचून ओम साई कंपनीमध्ये केमिकल मध्ये अंधारामध्येच नियंत्रण मिळवत मोठी दुर्घटना रोखली.
तळेगाव दाभाडे अग्निशामक दल, एम आय डी सी अग्निशामक दल तळेगाव दाभाडे, आपदा मित्र मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. एमआयडीसी अग्निशमन विभागाचे दिपक दोरुगडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे शेखर खोमणे, आपदा मित्र मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, सदस्य सर्जेस पाटील, गणेश ढोरे, शुभम काकडे, प्रशांत शेंडे, कुणाल दाभाडे, विनय सावंत, सत्यम सावंत इतर उपस्थित होते.
“ओम साई एंटरप्राईज वडगाव फाटा उर्से रोड प्लास्टिक पासून ऑइल तयार करते. कंपनीत लाईट गेल्यामुळे कूलर बंद झाला, नंतर प्रेशर वाढला. तापमान वाढल्याने कंटेनरचा ग्लास फुटून वायू आणि मटेरियल गळती सुरु झाली. पाईप लीक होऊन गॅस बाहेर आला” – दिपक दोरुगडे (एमआयडीसी अग्निशमन विभाग)
अधिक वाचा –
– भर पावसात आमदार सुनिल शेळकेंचे नागरिकांकडून जंगी स्वागत; वडगावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन अन् लोकार्पण
– मोठी बातमी! लोणावळा रेल्वे स्थानकावर इंजिनिअरिंग ब्लॉक, दुपारच्या सत्रातील ‘या’ लोकल रद्द