अभंग प्रतिष्ठान श्री क्षेत्र देहू यांच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे साध्या सोप्या भाषेत निरूपण असणारे “गाथा चिंतन” द्वितीय सत्र रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झाले. ( Gatha Chintan Second Session At Shri Kshetra Dehu By Abhang Pratishthan )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वारकरी दर्पणचे संपादक, संत साहित्याचे अभ्यासक सचिनदादा पवार यांनी अतिशय साध्या सोप्या आणि भक्तीपूर्ण अमृत वाणीतून संत तुकोबारायांचे अलौकिक जीवन व अभंग विचार सर्वांना समजावून देत अभंगांचा भावार्थ सांगितला. या गाथा चिंतन सत्रातील अभंग भावार्थ दादांच्या प्रसादिक वाणीतून समजून घेताना प्रत्येक जण अगदी तल्लीन होऊन गेला होता. त्या प्रत्येक शब्दातील भावभक्तीचा ध्वनी थेट हृदयाशी संवाद साधत होता. अंतरंगाची शुद्धता व जगण्यातील प्रेमभाव जपण्याचा संदेश हा अभंग विचार सांगत होता.
या गाथा चिंतन सत्रात सहभागी होण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी उपस्थित रहावे. सायंकाळी 6 वाजता उपस्थित रहावे. पुढील तृतीय- गाथा चिंतन सत्र रविवार 5 मार्च 2023 रोजी होणार आहे, अशी माहिती अभंग प्रतिष्ठान श्रीक्षेत्र देहू यांनी दिली. ( Gatha Chintan Second Session At Shri Kshetra Dehu By Abhang Pratishthan )
अधिक वाचा –
– हिंदूहृदयसम्राट चषक 2023 : लोणावळ्यात पार पडली भव्य क्रिकेट स्पर्धा, देहूरोड येथील 11 चॅलेंजर संघाने पटकावले विजेतेपद
– संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; प्रमुख पाहुणे रामदास काकडेंकडून विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचे कौतुक