रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून पॉस्को कंपनीच्या वतीने तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांना संगणक संच भेट देण्यात आला. कंपनीच्या व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीमधून हा उपक्रम राबवण्यात आला. पॉस्कोचे मुख्य संचालक गुनबे किम व मिंहो जो यांच्या हस्ते संगणक संच सुपूर्द करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रास्ताविक करत असताना रोटरीचे अध्यक्ष उध्दव चितळे यांनी कोविड काळात देखील रोटरीने वाहतूक पोलीस विभागाबरोबर काम केले आहे. आपण त्यांना संगणक प्रणाली उपलब्ध करून देऊ शकलो व गरज ओळखून मदत करू शकलो असे सांगितले. पॉस्कोकडून बोलताना नेहा वाघचौडे, अमोल बुद्धखळे यांनी समाधान व्यक्त केले. ( Gift of computer set to Talegaon Dabhade Traffic Police through Rotary Club and POSCO Company )
यावेळी पॉस्कोचे कार्यकारी संचालक गुनबे किम व मिनहो जो तसेच सचिन मरकळे, पृथ्वीराज देसाई, प्रदीप देशमुख, सचिन देशमुख, रोटरी क्लबचे सचिव श्रीशैल मेन्थे, महेश महाजन, यादवेंद्र खळदे, दीपक शहा, विलास जाधव, जयवंत देशपांडे, दीपक गांगोळी, राजेंद्र पोळ, प्रभाकर निकम, धनंजय मथुरे, राजू गोडबोले, अतुल हंपी, प्रसाद मुंगी, हृषिकेश कुलकर्णी, सुचित्रा कुलकर्णी, नीता देशपांडे, प्रमोद दाभाडे आणि वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी मनोज गुरव, लक्ष्मण मुथे, संजय रेपाळे, रमेश भोसले उपस्थित होते. रोटरीचे उपाध्यक्ष कमलेश कार्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– ‘ईव्हीएम मशीनमध्ये चीप बसवून उमेदवाराला जास्त मतदान करून देतो’ अशा बहाण्याने फसवणूक करणाऱ्याला अटक
– “मावळच्या विकासासाठी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही”, वाचा कोणी म्हटलंय असं… । Maval Lok Sabha
– दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा