Dainik Maval News : कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर ( Ekvira Vidya Mandir School Karla ) व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स येथील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक वाद्य साहित्यांची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी शिलाटणे येथील मावळ सहकार संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे यांंच्या वतीने ही वाद्य साहित्यांची भेट देण्यात आली. यात हार्मोनियम, तबला, ढोलकी, झांज, टाळ, हलगी यांंचा समावेश आहे.
साहित्यांचे पुजन शिलाटणेच्या माजी सरपंच संगीता भानुसघरे, गणपतराव भानुसघरे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, प्राचार्य संजय वंजारे, पोलीस पाटील संजय जाधव, कामगार नेते संदीप पानसरे, शिक्षक प्रतिनिधी संजय हुलावळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव आदींनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी कार्ला विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ सदस्य आणि एकविरा विद्या मंदिर शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी अभंग आणि गवळणी गायन करत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. ( Gift of cultural musical instruments to Ekvira Vidya Mandir School Karla News )
अधिक वाचा –
– लोणावळ्यासह मावळ तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे : आयपीएस सत्यसाई कार्तिक । Lonavala News
– शिष्यवृत्ती परीक्षेतील चमकदार कामगिरीसाठी कान्हे शाळेतील विद्यार्थी हिंदूराज कुटे याचा जिल्हास्तरावर गौरव । Maval News
– आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा । Maval News